Crunchy Delight: मसाला शेंगदाणे बनवण्याची सोपी रेसिपी

भारतात शेंगदाणे खाण्याची परंपरा फार जुनी आहे. खारे, उकडलेले किंवा मसाला दाणे हे सर्वांना आवडतात. त्यात मसाला दाणे विशेषतः लोकप्रिय आहेत. मसाला दाण्यांचे कुरकुरी
भारतात शेंगदाणे खाण्याची परंपरा फार जुनी आहे. खारे, उकडलेले किंवा मसाला दाणे हे सर्वांना आवडतात. त्यात मसाला दाणे विशेषतः लोकप्रिय आहेत. मसाला दाण्यांचे कुरकुरीत कोटींग आणि त्यातले विविध फ्लेवर लोकांना खूप आवडतात. सध्या बाजारात मसाला दाणे महाग झाले आहेत, त्यामुळे अनेकजण घरच्या घरीच मसाला शेंगदाणे बनवण्याकडे वळत आहेत. हे दाणे तयार करणे अगदी सोपे आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्यही सहज उपलब्ध आहे. या रेसिपीत तुम्हाला आवश्यक असलेल्या गोष्टींची यादी दिली आहे, ज्यामुळे तुम्ही सहजपणे मसाला शेंगदाणे तयार करू शकता.
साहित्याच्या यादीत शेंगदाणे, बेसन, तेल, मीठ, पाणी, लाल तिखट, चाट मसाला, हळद, हिरवी मिरची, कडीपत्ता, धणे - जिरे पूड यांचा समावेश आहे. मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे निवडावे लागतात. तुम्ही साल काढलेले किंवा भाजलेले शेंगदाणे वापरू शकता. त्यानंतर एका खोल वाडग्यात बेसन घालून त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालावे. हे सर्व एकत्र करून घट्ट पीठ तयार करावे. हे पीठ वड्यासाठी केलेल्या पीठापेक्षा थोडे घट्ट असावे, कारण पातळ पीठ शेंगदाण्यांना चिकटणार नाही.
पीठ तयार झाल्यावर त्यात शेंगदाणे घालून चांगले मिक्स करावे. कढईत तेल गरम करत ठेवा आणि त्यात शेंगदाणे सोडून त्यांना तळा. शेंगदाणे तळताना त्यांना चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत तळा. त्यानंतर कडीपत्ता आणि हिरवी मिरची घालून एकत्र करावे. तळून झाल्यावर शेंगदाणे चाळणीवर ठेवून त्यांचे तेल कमी होऊ द्या. एका वाटीत चाट मसाला, मीठ, धणे - जिरे पूड आणि लाल तिखट एकत्र करून मसाला तयार करा. तळलेले शेंगदाणे मसाला घालून चांगले मिक्स करा आणि हवाबंद डब्यात ठेवा. यामुळे तुमचे शेंगदाणे कुरकुरीत राहतील आणि तुम्हाला त्यांची चव आवडेल.



















