Pakistani Wrestler Missing After Commonwealth Games:कॉमनवेल्थ गेम्सनंतर पाकिस्तानी कुस्तीपटू बेपत्ता

ग्लासगो येथे २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडूंमध्ये काही बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेनंतर, खेळाडूंनी आपल्या
ग्लासगो येथे २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी गेलेल्या खेळाडूंमध्ये काही बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या स्पर्धेनंतर, खेळाडूंनी आपल्या पथकांसह मायदेशी परतण्याऐवजी बेपत्ता होणे, यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान आणि युगांडाच्या खेळाडूंमध्ये एकूण पाच बॉक्सर्स बेपत्ता झाल्याची माहिती आहे. यामध्ये युगांडाचे चार खेळाडू आणि पाकिस्तानचा एक खेळाडू समाविष्ट आहे. युगांडाचे खेळाडू मंगळवारी मायदेशी परतण्यापूर्वी पथकात उपस्थित राहिले नाहीत, तर पाकिस्तानी बॉक्सिंगपटू कुदरत उल्लाह याचा शोध घेतला असता तो आपल्या खोलीत आढळला नाही. स्कॉटलंडमधील कायदा अंमलबजावणी यंत्रणांना या खेळाडूंविषयी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, काही खेळाडूंचा संपर्क तुटल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. युगांडाच्या पथकप्रमुख गॉडविन कयांग्वे यांनी सांगितले की, पथकातील चार बॉक्सर्स बेपत्ता झाल्याबाबत त्यांना काहीच माहिती नाही. इब्राहिम केमिस, नुहू बट्टे, एमिली नाकालेमा आणि एंजेल कातुशाबे हे खेळाडू मंगळवारी युगांडाला परत जाणार होते. कयांग्वे यांनी बीबीसी स्कॉटलंडशी बोलताना स्पष्ट केले की, या खेळाडूंनी आपल्या टीम मॅनेजरशी संपर्क साधून परत येण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण त्यानंतर त्यांचे फोन बंद झाले. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, त्यांनी शिबिराचे नियम मोडले आहेत. त्यांच्या व्हिसा ऑक्टोबरपर्यंत वैध आहेत, त्यामुळे आशा आहे की ते अखेरीस आपल्या देशात परततील.
पाकिस्तानी बॉक्सिंगपटू कुदरत उल्लाहच्या बाबतीत, तो आपल्या पासपोर्टशिवाय गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा पासपोर्ट टीम मॅनेजरकडे होता. पाकिस्तान बॉक्सिंग महासंघाने सांगितले की, कुदरत उल्लाहला शेवटचं पहाटे सुमारे २ वाजता हॉटेलच्या खोलीत पाहण्यात आले होते. सकाळी ९ वाजता पाकिस्तानला रवाना होण्यासाठी संपूर्ण संघ हॉटेलच्या लॉबीमध्ये जमणार होता, मात्र अधिकाऱ्यांनी त्याच्या खोलीत पाहिलं असता तो तेथे नव्हता. राष्ट्रकुल किंवा ऑलिम्पिक स्पर्धांनंतर खेळाडू बेपत्ता होण्याची ही काही नवीन बाब नाही. २०२२ च्या बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेदरम्यान दोन बॉक्सर्स हॉटेलमधून बेपत्ता झाले होते. त्याचवेळी श्रीलंकेच्या पथकातील एक कुस्तीपटू, एक जुडोपटू आणि एक जुडो प्रशिक्षक हे कॉमनवेल्थ गावातून गायब झाल्याची नोंद झाली होती. २०१८ च्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेनंतरही ५० हून अधिक खेळाडू ऑस्ट्रेलियात बेकायदेशीररीत्या थांबले होते. याशिवाय, २०२४ च्या वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान पाकिस्तानी बॉक्सिंगपटू झोहेब रशीदने आपल्या रूममेटची परकीय चलनातील रक्कम आणि मौल्यवान वस्तू घेऊन इटलीतील बुस्टो अर्सिझिओ शहरातून गायब झाल्याची घटना देखील समोर आली होती.











