Explosion while defusing bomb:जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर क्षेत्रात कांगा गली भागात नियंत्रण रेषेवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या जवानांनी एक सुरुंग निकामी करत अस
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर क्षेत्रात कांगा गली भागात नियंत्रण रेषेवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या जवानांनी एक सुरुंग निकामी करत असताना अचानक झालेल्या स्फोटात दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. या जवानांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत अधिक माहिती मिळाल्यानुसार, नियंत्रण रेषेवर दहशतवाद्यांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरुंग पेरले जातात. परंतु, गेल्या काही दिवसांच्या मुसळधार पावसामुळे अनेक सुरुंग वाहून गेले आहेत, ज्यामुळे अशा घटनांना आमंत्रण मिळत आहे. कांगा गली भागात सैन्याच्या गस्ती पथकाला एक वाहून आलेला सुरुंग आढळून आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बॉम्ब शोधक आणि नाषक पथकाला बोलावण्यात आले होते.
सैन्याचे तज्ज्ञ जवान जेव्हा हा सुरुंग निकामी करण्याचा प्रयत्न करत होते, त्याचवेळी अचानक भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन्ही जवान गंभीर जखमी झाले. स्फोटानंतर तात्काळ प्राथमिक उपचार करून जखमी जवानांना लष्कराच्या जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की, सीमावर्ती भागात घुसखोरी रोखण्यासाठी एंटी-इन्फिल्ट्रेशन ऑब्स्टॅकल सिस्टीमचा भाग म्हणून सुरुंग पेरले जातात. मात्र, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हे सुरुंग वाहून सामान्य रस्ते किंवा गस्तीच्या मार्गांवर येतात, ज्यामुळे अशा प्रकारच्या दुर्घटनांना आमंत्रण मिळते.














