Pothole Repair Proposal:खड्डे बुजविण्यासाठी ३.८५ कोटींचा प्रस्ताव

मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे, तरीही अनेक भागांमध्ये खड्ड्यांची समस्या अद्याप कायम आह
मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षांत रस्त्यांच्या काँक्रिटीकरणावर मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे, तरीही अनेक भागांमध्ये खड्ड्यांची समस्या अद्याप कायम आहे. शहर विभागातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका प्रशासनाने ३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामुळे महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी या प्रस्तावावर तीव्र टीका केली आहे. महापालिका प्रशासनाने सिमेंट काँक्रिटीकरणाच्या प्रकल्पामुळे खड्डे दुरूस्तीच्या खर्चात बचत झाल्याचा दावा केला होता, पण प्रत्यक्षात खड्ड्यांची संख्या कमी झालेली नाही. शहर विभागातील १२९ किमी रस्त्यांपैकी ५६ किमी रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. जूनपासून आतापर्यंत महापालिकेला खड्ड्यांबाबत १२२८ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यापैकी ११६३ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. ४१ तक्रारी अन्य प्राधिकरणांकडे पाठविण्यात आल्या आहेत. शहर भागातील विभाग ए, बी, सी, डी आणि ई मधील खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ३.८५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे.
महापालिका प्रशासनाचा मानस आहे की मार्च २०२७ पर्यंत सर्व खड्डे बुजवले जातील. मात्र, काँक्रिटीकरणावर कोटींचा खर्च करूनही पुन्हा खड्डे बुजविण्यासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कंत्राटासाठी महापालिकेने मेसर्स. मानष कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड केली आहे. ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी २ कोटी १ लाख ९९ हजार ९४४ रुपये, तर ९ मीटरपेक्षा कमी रुंदीच्या खड्ड्यांसाठी १ कोटी ८३ लाख १८ हजार ५७७ रुपये खर्च करण्यात येणार आहे. यामुळे एकूण ३ कोटी ८५ लाख १८ हजार ५२१ रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.



















