Recruitment:राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर पदभरतीसाठी मुदतवाढ… पण पदभरतीत अडचणी राहणारच? नेमके कारण काय?

पुणे: महाराष्ट्रातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आणि अध्यापक विद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भ
पुणे: महाराष्ट्रातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालये आणि अध्यापक विद्यालयांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर पदांच्या भरतीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेसाठी शैक्षणिक संस्थांना आता तीन महिने अतिरिक्त मुदत मिळाली आहे. हे सर्व सक्षम प्राधिकरणाकडून जाहिरातीसाठी परवानगी मिळाल्यानंतरच शक्य होणार आहे. तथापि, पवित्र संकेतस्थळ एक वर्षापासून बंद असल्यामुळे अनुदानित शाळांमध्ये पदभरती प्रक्रियेत अडचणी येण्याची शक्यता शिक्षण संस्थांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या मुदतीचा उपयोग कसा होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शालेय शिक्षण विभागाने याबाबत एक शुद्धिपत्रक जारी केले आहे. ६ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या शासन निर्णयानुसार, पदभरतीसाठी जाहिरात देण्यास परवानगी मिळाल्यानंतर संस्थांना दोन महिन्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करणे बंधनकारक आहे. तथापि, प्रत्यक्षात शैक्षणिक संस्थांना या मुदतीत कार्यवाही करण्यासाठी अनेक व्यावहारिक अडचणींचा सामना करावा लागतो. यामध्ये टपाल सेवा, जावक विभागातील विलंब, अर्जांची छाननी, मुलाखती, अध्यापन कौशल्य चाचणी, प्रशासकीय मान्यता आणि उमेदवारांच्या रुजू होण्याचा कालावधी यासारख्या अडचणींचा समावेश आहे.



















