Innovative Study Movement: धाराशिव जिल्ह्यात अभ्यासाची नवी 'लोकचळवळ'!

धाराशिव जिल्ह्यातील ७१२ गावांमध्ये संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायतीच्या भोंग्याच्या आवाजासोबतच एक अनोखी चळवळ सुरू झाली आहे. या उपक्रमात घराघरांत टीव्ही आणि मोब
धाराशिव जिल्ह्यातील ७१२ गावांमध्ये संध्याकाळी सात वाजता ग्रामपंचायतीच्या भोंग्याच्या आवाजासोबतच एक अनोखी चळवळ सुरू झाली आहे. या उपक्रमात घराघरांत टीव्ही आणि मोबाइल बंद करून मुलांना दोन तास अभ्यास करण्यास प्रवृत्त केले जाते. 'आपला जीव धाराशिव-व्हिजन २०३०' या संकल्पनेअंतर्गत जिल्हा परिषदेतर्फे सुरू केलेला हा उपक्रम आता एक सामाजिक चळवळ बनला आहे. डिजिटल युगात मुलांच्या वाढत्या 'स्क्रीन टाइम' समस्येवर मात करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरला आहे. यामध्ये मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, मोबाइलचा वापर कमी करावा आणि कुटुंबातील संवाद पुन्हा जिवंत करावा, हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. शासकीय कर्मचारी गावांमध्ये जाऊन या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत.
या हटके उपक्रमात सायंकाळी ७ ते ९ या वेळेत घरातील टीव्ही आणि मोबाइल पूर्णपणे बंद ठेवले जातात. भोंग्याच्या आवाजाने या उपक्रमाची सुरुवात होते आणि पालकांनीही या दोन तासांत मोबाइल बाजूला ठेवून मुलांसोबत बसण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे घरात संवाद वाढला आहे आणि पालक-मुलांमध्ये एकत्रित अनुभव घेण्याची संधी मिळाली आहे. अनेक पालकांनी या उपक्रमामुळे मिळालेल्या अनुभवांचे फोटो आणि कथा सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे या उपक्रमामुळे फक्त मुलांचाच फायदा झालेला नाही, तर पालकांना देखील 'डिजिटल डिटॉक्स' मिळाला आहे.



















