TISS Convocation Ceremony Rescheduled:टीआयएसएसचा दीक्षांत समारंभ २२ ऑगस्ट रोजी ; रद्द झालेल्या कार्यक्रमाच्या प्रवासखर्चाची विद्यार्थ्यांना भरपाई

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) चा ८६वा वार्षिक दीक्षांत समारंभ आता २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या समारंभाबाबतची
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) चा ८६वा वार्षिक दीक्षांत समारंभ आता २२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात येणार आहे. या समारंभाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे दिली गेली आहे. हा समारंभ पूर्वी २ ऑगस्ट रोजी होणार होता, परंतु काही अनपेक्षित कारणांमुळे तो रद्द करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना या बदलाबाबत माहिती देण्यात आली असून, त्यांनी ७ ऑगस्टपर्यंत उपस्थितीची माहिती संस्थेला कळवावी, असे सांगितले आहे. समारंभाच्या सविस्तर कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. विविध शैक्षणिक विभागांच्या सचिवालयांना विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, जेणेकरून उपस्थितीची खात्री करता येईल.
टीआयएसएसच्या दीक्षांत समारंभाच्या रद्द झालेल्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे संस्थेने ३१ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत झालेल्या प्रवास खर्चाची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांना मूळ प्रवास तिकिटे, बोर्डिंग पास, बिले आणि इतर संबंधित कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. रद्द झालेल्या प्रवासासाठी तिकिटांच्या मूळ प्रतीही जमा कराव्यात, असे संस्थेने स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळेल, ज्यामुळे त्यांची काहीशी चिंता कमी होईल.



















