Teacher Recruitment: शिक्षक भरतीसाठी ३० हजारांपेक्षा जास्त जागा उपलब्ध

पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षकांच्या ३० हजार २०९ पदांसाठी पवित्र संकेतस्थळावर भरती प्र
पुणे: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळा आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षकांच्या ३० हजार २०९ पदांसाठी पवित्र संकेतस्थळावर भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी मिळणार आहे. पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याने, अनेक पात्र उमेदवारांना या प्रक्रियेत भाग घेण्याची संधी मिळाली आहे, ज्यामुळे त्यांना अपेक्षित दिलासा मिळाला आहे. शिक्षण विभागाने या संदर्भात अधिकृत माहिती प्रसिद्ध केली आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ ही परीक्षा २७ ते ३० मे तसेच २ ते ५ जून २०२५ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यात २ लाख ११ हजार ३०८ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. या परीक्षेतील गुणांच्या आधारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. शासनाच्या आदेशानुसार, रिक्त पदे आणि शिल्लक आरक्षण विचारात घेऊन ८० टक्के पदांसाठी भरती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पवित्र संकेतस्थळावर जाहिरातींची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरतीची मागणी नोंदवण्यात आली आहे. यामध्ये १९८८१ पदे मुलाखतीशिवाय आणि १०३२८ पदे मुलाखतीसह आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



















