Inspiring Business Journey: ११ लाखांची कॉर्पोरेट नोकरी सोडून तरुणाचा भन्नाट बिझनेस

आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अनेकांसाठी एक मोठा निर्णय असतो. मात्र, योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोर
आजच्या स्पर्धात्मक युगात चांगल्या पगाराची कॉर्पोरेट नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अनेकांसाठी एक मोठा निर्णय असतो. मात्र, योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर हा निर्णय घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचे एक उत्तम उदाहरण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. बंगळुरूतील एका तरुणाने ११ लाखांच्या पॅकेजला फाटा देत पाण्याच्या व्यवसायात प्रवेश केला आणि आज तो यातून लाखोंची कमाई करत आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 'iamankitpande' या युजरने या तरुणाची प्रेरणादायी कथा शेअर केली आहे. त्याने सांगितले की, त्याच्या मित्राने कॉर्पोरेट क्षेत्रातील ताणतणाव आणि स्पर्धेत अडकण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला, जो त्याला अधिक समाधान देत आहे.
या तरुणाने नोकरी सोडल्यानंतर आपल्या गावी परत येऊन स्वतःच्या जागेवर वॉटर प्युरिफायिंग प्लांट उभारला. त्यानंतर त्याने स्थानिक घरांमध्ये आणि दुकांमध्ये शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू केला. सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करत, त्याने आपल्या ग्राहकांची संख्या वाढवली. सध्या तो ३०० घरांपर्यंत पाण्याचा पुरवठा करतो आणि दररोज ३०० पाण्याचे कॅन विकतो. एका कॅनची किंमत ३० रुपये असल्यामुळे, त्याची रोजची उलाढाल ९ हजार रुपयांच्या आसपास पोहोचते. महिन्याच्या हिशोबाने, हा आकडा २.७ लाख रुपयांपर्यंत जातो, जो त्याच्या व्यवसायाच्या यशाची ग्वाही देतो.



















