Tree Plantation Initiative:वृक्ष लागवडीचा महापालिकेचा संकल्प

वसई शहरात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेने ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प केला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे आणि विकासकामांमुळे वसईचा
वसई शहरात पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेने ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी संकल्प केला आहे. वाढत्या अतिक्रमणामुळे आणि विकासकामांमुळे वसईचा हरित पट्टा कमी होत चालला आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. यावर्षी महापालिकेने पाच हजार वृक्षांची लागवड यापूर्वीच केली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आणि सामाजिक संस्थांच्या सहकार्याने ही लागवड विविध ठिकाणी करण्यात आली आहे. वसई विरार क्षेत्रात सिमेंटच्या जंगलामुळे प्रदूषण वाढत आहे आणि हरित पट्ट्यातील अतिक्रमणामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहेत. यामुळे महापालिकेने वृक्ष लागवडीच्या उपक्रमाला गती दिली आहे. ५० हजार वृक्षांचे रोपण यंदा करण्यात येणार आहे. यामध्ये देशी प्रजातींच्या झाडांचा समावेश आहे, जसे की ताम्हण, करंज, बकुळ, बहावा, वड, पिंपळ, आंबा इत्यादी. पावसाळा सुरू झाल्यापासून वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आहे. 'एक कोटी वृक्ष लागवड' आणि 'राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यकम' अंतर्गत ५ हजारांहून अधिक झाडांची लागवड करण्यात आली आहे. बोळींज येथील क्रीडा संकुलात आणि जीवदानी मंदिर परिसरात वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. यावेळी उप-महापौर मार्शल लोपीस आणि आयुक्त पृथ्वीराज बी.पी. उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नागरिकांनी 'वृक्ष दत्तक योजने'चा लाभ घेऊन झाडे जगवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील वर्षी महापालिकेने ६५ हजार वृक्षांची लागवड केली होती. महापालिका पर्यावरण संवर्धनासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत आहे आणि वृक्ष लागवड व संवर्धनासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. यंदा ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. वृक्ष लागवड सुरू असून त्यांचे संवर्धन देखील केले जात आहे, असे उपआयुक्त स्वाती देशपांडे यांनी सांगितले.



















