Tukaram Mundhe Fitness Tips: तुकाराम मुंढे यांनी सांगितला फिटनेस मंत्र; निरोगी राहण्यासाठी दिल्या खास टिप्स

आहार व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे एक शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या कार्यपद
आहार व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे एक शिस्तप्रिय आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी 'लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांच्या कार्यपद्धतीबरोबरच फिटनेसवरही चर्चा केली. मुंढे यांच्या फिटनेस टिप्सवर तरुणाईमध्ये विशेष चर्चा सुरू आहे. त्यांनी व्यस्त जीवनशैलीतही फिटनेस कसा राखावा याबद्दल महत्त्वाचे विचार मांडले. 'शरीराची तंदुरुस्ती दोन गोष्टींवर अवलंबून आहे, म्हणजे काय खावे आणि काय टाळावे,' असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या त्यांना टाळावयाच्या गोष्टींचा उल्लेख करताना HFSS म्हणजेच हाय फॅट, ट्रान्स फॅट, शुगर आणि सॉल्टी पदार्थ तसेच तळलेले खाद्यपदार्थ यांचा समावेश केला. मुंढे यांनी त्यांच्या आवडत्या खाद्यपदार्थांबाबतही माहिती दिली. 'माझी आई बनवलेली मसाला वडी आणि पिठाचं वांगं मला खूप आवडते, पण हे पदार्थ दररोज खाणे योग्य नाही,' असे त्यांनी सांगितले. 'जर तुम्ही ९०-१० किंवा ८०-२० प्रमाणात खाल्ले तर ते चांगले आहे, पण हे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत,' असे त्यांनी स्पष्ट केले.
फिटनेसच्या बाबतीत मुंढे यांनी वयानुसार आहार बदलण्याचे महत्त्व सांगितले. 'तिशीनंतर आणि चाळीशीनंतर आपल्या डाएटमध्ये बदल आवश्यक आहे. वयानुसार आपली भूक आणि कॅलोरीची गरज बदलते,' असे ते म्हणाले. 'आपल्या खाण्याच्या सवयी महत्त्वाच्या आहेत. रात्री उशिरा जेवल्यास त्याचा वाईट परिणाम होतो,' असे त्यांनी स्पष्ट केले. मुंढे यांच्या मते, डाएट म्हणजे उपाशी राहणे नव्हे, तर समतोल आहार घेणे आवश्यक आहे. 'व्यायाम नियमितपणे करावा लागतो आणि पुरेशी झोप घ्यावी लागते,' असे त्यांनी सांगितले. 'आपण नेहमी कारणे देतो, पण हे चुकीचे आहे. प्रत्येकाचे शरीर वेगळे आहे, त्यामुळे आहारही वेगळा असावा लागतो,' असे त्यांनी स्पष्ट केले.



















