How Often Should You Have Sex Based on Your Age: तुमच्या वयानुसार किती वेळा लैंगिक संबंध ठेवणं सामान्य मानलं जातं?

लैंगिक संबंधांच्या वारंवारतेबाबत अनेकांना प्रश्न असतो, विशेषतः वयानुसार हे कसे बदलते याबाबत. संवाद, विश्वास आणि भावनिक जवळीक यांसारख्या घटकांबरोबरच शारीरिक जवळी
लैंगिक संबंधांच्या वारंवारतेबाबत अनेकांना प्रश्न असतो, विशेषतः वयानुसार हे कसे बदलते याबाबत. संवाद, विश्वास आणि भावनिक जवळीक यांसारख्या घटकांबरोबरच शारीरिक जवळीक देखील अनेक जोडप्यांच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, 'एक जोडपे किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे' याबाबत एक निश्चित उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरज भिन्न असते, ज्यामुळे या विषयावर अनेकांच्या मनात संभ्रम असतो. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेतील Kinsey Institute for Research in Sex, Reproduction and Gender या संस्थेने केलेल्या संशोधनाने विविध वयोगटांतील लोक वर्षभरात सरासरी किती वेळा शारीरिक संबंध ठेवतात, याबाबत महत्त्वाची आकडेवारी दिली आहे. तथापि, या आकडेवारीचा अर्थ असा नाही की प्रत्येकाने याच प्रमाणात संबंध ठेवले पाहिजेत. हे फक्त सरासरी आकडे आहेत, आणि प्रत्येक जोडप्यातील भावनाबंध वेगवेगळे असतात हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
संशोधनानुसार, १८ ते २९ वर्षे वयोगटातील व्यक्ती वर्षभरात सरासरी ११२ वेळा शारीरिक संबंध ठेवतात. या वयोगटात शारीरिक ऊर्जा, आकर्षण आणि नात्यातील उत्साह अधिक असल्याने ही संख्या तुलनेने जास्त असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. ३० ते ३९ वर्षे वयोगटात ही संख्या कमी होऊन ८६ वेळा प्रतिवर्ष इतकी असल्याचे आढळले आहे. त्यानंतर ४० ते ४९ वर्षे वयोगटात ही सरासरी आणखी कमी होऊन ६९ वेळा प्रतिवर्ष इतकी असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. याशिवाय, संशोधनात एक लक्षवेधी निरीक्षण समोर आले आहे की, सुमारे १३ टक्के विवाहित जोडपी वर्षभरात फारच कमी वेळा शारीरिक संबंध ठेवतात, तर ४५ टक्के जोडपी महिन्यात केवळ काही वेळाच शारीरिक संबंध ठेवतात.



















