Cleaning Tips for Mixer:मिक्सरची स्वच्छता कशी करावी

भारतीय स्वयंपाकघरात मिक्सर ग्राइंडर हा एक अत्यंत आवश्यक साधन बनला आहे. मसाले, चटणी किंवा ज्यूस बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मिक्सरचा वापर नियमितपणे होतो, पण
भारतीय स्वयंपाकघरात मिक्सर ग्राइंडर हा एक अत्यंत आवश्यक साधन बनला आहे. मसाले, चटणी किंवा ज्यूस बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. मिक्सरचा वापर नियमितपणे होतो, पण त्याच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. मिक्सरच्या भांड्याची स्वच्छता करणे सोपे असले तरी, त्याच्या मशीनच्या मुख्य भागातील कपलर रिंग आणि कोपऱ्यांची स्वच्छता करणे कठीण असते. मसाले, तेल, पिठाचे कण आणि पाण्याचे थेंब एकत्र येऊन या रिंगच्या बारीक फटीत चिकट घाणीचा थर साचतो. हाताने किंवा साध्या कापडाने पोहोचता येत नसल्याने ही घाण वर्षानुवर्षे तशीच राहते, ज्यामुळे दुर्गंधी आणि बॅक्टेरिया वाढू लागतात. मिक्सरच्या या भागात थेट पाणी वापरणे धोकादायक ठरू शकते, कारण त्यामुळे मोटरमध्ये पाणी जाऊन मिक्सर जळण्याचा किंवा शॉट सर्किट होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाणी न वापरता मिक्सरची स्वच्छता कशी करावी हे जाणून घेऊया.
मिक्सरच्या रिंगमधील घाण साफ करण्यासाठी एक जुना टूथब्रश वापरा. त्यावर २-३ थेंब भांडी घासायचे लिक्विड सोप लावा. पाणी न वापरता फक्त ब्रशने रिंगच्या चारही बाजूंना आणि कोपऱ्यांमध्ये साचलेल्या घाणीवर हलक्या हाताने घासून घ्या. यामुळे फटींमध्ये अडकलेली घाण, सुका कचरा आणि चिकटपणा बाहेर येईल. त्यानंतर एका कोरड्या कापडाने किंवा टिश्यू पेपरने तो भाग व्यवस्थित पुसून घ्या. यामुळे मिक्सरची रिंग आणि कोपरे स्वच्छ होतील आणि मिक्सर नव्यासारखा दिसेल. यानंतर, एका वाटीत १ चमचा बेकिंग सोडा आणि थोडेसे पाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट टूथब्रशच्या साहाय्याने रिंगच्या कोपऱ्यांमध्ये लावा आणि ५-१० मिनिटांसाठी तशीच राहू द्या. बेकिंग सोड्यामुळे घाण मऊ होईल, त्यामुळे ब्रशने हलके घासून घाण बाहेर काढा आणि एका किंचित ओलसर कापडाने पुसून कोरड्या कापडाने स्वच्छ करा.



















