Arundhati Roy's Statement: अरुंधती रॉय यांची मोदींच्या प्रतिमेवर प्रतिक्रिया

प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या नेतृत्वात दिल्लीच्
प्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या नेतृत्वात दिल्लीच्या जंतर-मंतर येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी यांची दोन दशकांहून अधिक काळ जपलेली प्रतिमा केवळ दोन आठवड्यात धुळीस मिळाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, रॉय यांनी यासंदर्भात सांगितले की, या आंदोलनाने कोणत्याही निवडणुकीतील विजयापेक्षा अधिक महत्त्वाचा राजकीय धक्का दिला आहे. 'मदर मेरी कम्स टू मी' या पुस्तकाच्या अनुवादाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना रॉय यांनी या आंदोलनावर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणुकीतील विजय हा राजकारणाचा एक भाग असला तरी, अलीकडे झालेल्या जनआंदोलनाने दाखवून दिले की, अनेक दशकांपासून पेरलेल्या विचारसरणीला काही आठवड्यांतच हादरे बसू शकतात. रॉय यांच्या मते, 'माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशाचे भविष्य काय असेल, हे कोणालाच माहीत नाही. कदाचित त्याची पटकथा लिहिली जात असेल आणि प्रत्येकाची त्यात भूमिका आहे. लोकांना वाटायचे की, त्यांना हजार वर्षे त्या परिस्थितीत राहावे लागेल, पण दोन आठवड्यांतच परिस्थिती मुळापासून बदलली आहे.'
अरुंधती रॉय यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील पत्रकार परिषद न घेण्याबद्दलही टीका केली. त्यांनी सांगितले की, मोदींनी १२ वर्षांच्या कार्यकाळात एकदाही पत्रकार परिषद घेतलेली नाही. 'कोट्यवधी रुपये खर्च करून गेल्या २४ वर्षांत त्यांची प्रतिमा घडवली गेली आहे. काही लोक त्यांना विष्णूचा अवतार मानतात, पण झुरळांनी अवघ्या दोन आठवड्यात त्यांची २४ वर्षांची प्रतिमा उद्ध्वस्त केली,' असे रॉय यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी निवडणूक जिंकणे हे महत्त्वाचे नसून, या आंदोलनाने दिलेला संदेश अधिक महत्त्वाचा आहे, असे सांगितले. रॉय यांनी सरकारच्या पुढील कारवायांवरही भाष्य केले आणि म्हटले की, 'जर सरकारने महत्त्वाच्या संस्थांचे नियंत्रण आपल्या हातात ठेवले, तर हे आव्हान इथेच संपले असे समजू नये.'



















