Parliament uproar:राज्यसभेत भाजप-काँग्रेसमध्ये तुफान वाद

सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज राज्यसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांच्या एका व
सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, आज राज्यसभेत जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. महाराष्ट्रातील भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अनिल सुखदेवराव बोंडे यांच्या एका विधानामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये तीव्र शाब्दिक संघर्ष झाला. सत्ताधारी पक्षाने काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बोंडे यांनी २०१४ पूर्वीच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, 'कोळसा चोर, भ्रष्टाचारी आणि दहशतवादी कुठे मिळतील?' यावर भाजपच्या इतर खासदारांनी एकत्रितपणे 'काँग्रेसच्या कार्यालयात!' असे उत्तर दिले. यामुळे सभागृहात एकच गदारोळ माजला. बोंडे यांनी पुढे प्रश्न केला, 'देशद्रोही कुठे मिळतील?' आणि 'शेतकरी विरोधी कुठे मिळतील?' यावरही भाजपच्या खासदारांनी पुन्हा 'काँग्रेसच्या कार्यालयात!' अशी घोषणाबाजी सुरू केली. ही स्थिती पाहता, सभागृहात तणाव निर्माण झाला आणि चर्चा थांबली नाही.
काँग्रेसच्या खासदारांनी भाजपच्या या घोषणाबाजीवर तीव्र आक्षेप घेतला. काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी भाजपच्या खासदारांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना म्हटले, 'जर भाजप खासदारांचा दावा खरा असेल, तर २०१४ मध्ये सत्ता आल्यापासून त्यांनी काँग्रेस कार्यालयातून किती दहशतवाद्यांना अटक केली? हे स्पष्ट करावे.' मसूद यांनी पुढे सांगितले की, 'जर त्यांनी एकाही दहशतवाद्याला अटक केली नसेल, तर हे त्यांच्या सरकारचे अपयश आहे.' यामुळे काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत की, हे सर्व जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून वळवण्यासाठी केले जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये तणाव वाढला आहे आणि राजकीय वातावरण अधिक तापले आहे.



















