E-cigarettes and Health Risks:ई-सिगारेटमुळे फुप्फुसांची शिट्टी वाजणार; 'पॉपकॉर्न लंग' जडणार, नेमका काय आहे हा आजार?

ई-सिगारेट आणि व्हेपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एक गंभीर आरोग्य समस्या समोर येत आहे, जी 'पॉपकॉर्न लंग' म्हणून ओळखली जाते. या आजारामुळे फुप्फुसांतील सूक्ष्म श्
ई-सिगारेट आणि व्हेपिंगच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे एक गंभीर आरोग्य समस्या समोर येत आहे, जी 'पॉपकॉर्न लंग' म्हणून ओळखली जाते. या आजारामुळे फुप्फुसांतील सूक्ष्म श्वसननलिका कायमची हानी होऊ शकते. यामुळे व्यक्तीला सतत कोरडा खोकला, धाप लागणे, आणि श्वास घेताना घरघर आवाज येणे यासारखी लक्षणे अनुभवावी लागतात. त्यामुळे तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये छातीत जडपणा, थकवा, आणि व्यायाम सहन न होणे यांचा समावेश होतो. त्यामुळे, या समस्येवर त्वरित उपचार घेणे आवश्यक आहे.
पॉपकॉर्न लंग हा आजार सामान्य पॉपकॉर्न खाण्यामुळे होत नाही, तर याचा संबंध औद्योगिक रसायनांच्या वाफेमुळे आहे. विशेषतः, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नच्या उत्पादनात काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये या आजाराचे प्रमाण अधिक आढळले आहे. त्यामुळे या आजाराला 'पॉपकॉर्न लंग' हे नाव देण्यात आले आहे. फुप्फुसांच्या कार्यक्षमतेची तपासणी करण्यासाठी विविध वैद्यकीय चाचण्या जसे की एचआरसीटी स्कॅन, ब्रॉन्कोस्कोपी यांचा वापर केला जातो. उपचारामध्ये स्टिरॉइड्स, औषधे, ऑक्सिजन थेरपी, आणि गंभीर रुग्णांसाठी फुफ्फुस प्रत्यारोपण यांचा समावेश असतो.
तरुणांमध्ये ई-सिगारेट आणि व्हेपिंगच्या वापरात चिंताजनक वाढ होत आहे. याशिवाय, शहरातील रासायनिक कारखाने आणि खाद्यप्रक्रिया उद्योगातील रसायनांचा धोका देखील वाढला आहे. विषारी धूर आणि वायूच्या संपर्कामुळे फुप्फुसांना गंभीर हानी होऊ शकते. त्यामुळे, ई-सिगारेट आणि व्हेपिंग पूर्णपणे टाळणे आवश्यक आहे. औद्योगिक ठिकाणी मास्क आणि सुरक्षा साधनांचा वापर करणे, तसेच धूळ, धूर आणि विषारी वायूंचा संपर्क टाळणे हेही महत्त्वाचे आहे. लक्षणे दिसल्यास त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.



















