Crime: सोलापुरात लग्न ठरलेल्या २२ वर्षीय तरुणाची हत्या

सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. नई जिंदगी पोलीस चौकीजवळील पाण्याच्या टाकीच्या खाली २२ वर
सोलापूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. नई जिंदगी पोलीस चौकीजवळील पाण्याच्या टाकीच्या खाली २२ वर्षीय उमर मौलाली बिराजदार यांचा मृतदेह सापडला. उमर यांचे वय २२ वर्षे असून ते सिद्धेश्वर गांधी नगर, मठाजवळ सोलापुर येथे राहत होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते ९:३० वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली की शांतीनगर येथील पाण्याच्या टाकीच्या खाली एक तरुण बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याच्या जवळच एक दुचाकी वाहन देखील पडलेले आढळले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचताच उमरवर कोणत्यातरी धारदार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबुराव बिराजदार, सोलापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उमर बिराजदार यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी झाला होता आणि त्यांच्या लग्नाची तयारी चालू होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन-तीन महिन्यांत उमर यांचे लग्न होणार होते. या घटनेने त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमरच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य शोकसागरात बुडाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे आणि आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरातील CCTV कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली आहे.



















