








मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात कठोर कारवाया केल्या आहेत. साहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली
मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी गेल्या वर्षभरात कठोर कारवाया केल्या आहेत. साहाय्यक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ४ ऑगस्ट २०२५ ते ३ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ४७७ छापे टाकण्यात आले. या छाप्यात ७५० संशयितांना अटक करण्यात आली असून, एकूण ३ कोटी ९ लाख ५५ हजार ४२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारीच्या कण्यावर मोठा प्रहार करण्यात आला आहे. पोलिसांनी ड्रग्जच्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबवली, ज्यामध्ये ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गत ३२ कारवायांमध्ये ६३ संशयितांना अटक करण्यात आली. यामध्ये एमडी पावडर, कोडीन सिरपच्या १८३३ बाटल्या, अल्प्रझोलमच्या १७,७६५ गोळ्या आणि गांजा यांचा समावेश आहे, ज्याची एकूण किंमत २५.८२ लाख रुपये आहे. याशिवाय पवारवाडी पोलीस ठाण्यात या गुन्ह्यातील आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत ५४ कारवायांमध्ये ८० आरोपींकडून १९ गावठी कट्टे, २० जिवंत काडतुसे, ३० तलवारी, कोयते आणि इतर घातक शस्त्रे जप्त केली आहेत. याशिवाय प्राणी संरक्षण कायद्यानुसार १३१ कारवायांमध्ये ३९० जिवंत गोवंश आणि ११,९०० किलो मांसासह वाहने जप्त करण्यात आली, ज्याची एकूण किंमत १.९६ कोटी रुपये आहे. प्रतिबंधित गुटख्याच्या ३४ कारवायांमध्ये ३७.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर जुगाराच्या १०० धाडींमध्ये २७४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारवायांमुळे शहरात गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.
गेल्या वर्षभरात रमजान ईद, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, ईद-ए-मिलाद आणि सप्तशृंगी गडासाठी शिरपूर रथ यात्रा यासारखे सण अत्यंत शांततेत पार पडले आहेत. मनपा निवडणूक २०२६ दरम्यान ९२ मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हेगारीच्या कण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वर्षभरात १४ सराईत गुन्हेगारांना नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या सर्व कारवायांनी मालेगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
Pakistani Wrestler Missing After Commonwealth Games:कॉमनवेल्थ गेम्सनंतर पाकिस्तानी कुस्तीपटू बेपत्ता


Kidnapping Incident Over Payment Dispute:कोयते न मिळाल्यामुळे उसतोड मुकादमाचे अपहरण
Cyber Fraud in Pathri:पाथरीतील सायबर फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल
Cyber Fraud Alert:कमिशनच्या लालसेने संकटात!
Attempt to Impress Brother Ends in Jail:भाईला इम्प्रेस करायला गेला अन् थेट जेलमध्ये पोहोचला!
Murder outside Meditation Center: बाणेरमध्ये मेडिटेशन सेंटरबाहेर जागामालकाची चाकूने भोसकून हत्या
Cyber Theft in Pathri:ऑटो चालकाची १ लाख ९६ हजारांची लूट
Tiger Attack in Front of Wife:पत्नीच्या डोळ्यादेखत वाघाचा हल्ला
Victim of Superstition: जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाचा घेतला जीव
Tragic Incident in Sangli: पाडळीत तरुणाने आत्महत्या केली
Gang War in Haryana: हरयाणामध्ये गँगवॉरचा भीषण हल्ला