Joint Security Drill: हिंजवडी आयटी पार्कमध्ये संयुक्त सुरक्षा सराव

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये भारतीय आणि अमेरिकन विशेष सुरक्षा दलांनी एकत्रितपणे सुरक्षा सराव केला. या सरावात अमेरिकेच्या १७ विशेष कमांडोंसह भारतीय नॅशनल सिक
पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कमध्ये भारतीय आणि अमेरिकन विशेष सुरक्षा दलांनी एकत्रितपणे सुरक्षा सराव केला. या सरावात अमेरिकेच्या १७ विशेष कमांडोंसह भारतीय नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या (एनएसजी) १०० हून अधिक 'ब्लॅक कॅट' कमांडोंनी सहभाग घेतला. या पाच तासांच्या मॉकड्रिलमध्ये दहशतवादी हल्ला आणि संवेदनशील क्षेत्राचे संरक्षण यासारख्या विविध परिस्थितींचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. हिंजवडी आयटी पार्क हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध आयटी हब मानला जातो, त्यामुळे या परिसराची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या सरावाचा उद्देश म्हणजे संभाव्य दहशतवादी हल्ल्यांवर तात्काळ प्रतिसाद देण्याची तयारी करणे आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेणे.
बुधवारी सायंकाळी, माण-हिंजवडी परिसरातील एका प्रसिद्ध आयटी कंपनीच्या आवारात अचानक सायरन वाजला आणि विशेष सुरक्षा दलाचा ताफा दाखल झाला. एनएसजीचे 'ब्लॅक कॅट' कमांडो आणि अमेरिकन विशेष कमांडो अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होते. सुरुवातीला, या कारवाईमुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले, परंतु लवकरच हे एक पूर्वनियोजित सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. या सरावात, दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीत काय कार्यवाही करावी, फस्ट रिस्पॉंडर कोण असेल, वाहतूक नियंत्रण कसे करावे, बॉम्ब शोधक पथकाची कार्यवाही कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.



















