Murder Case Acquittal:कल्याणमध्ये मुलाच्या हत्येच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता

कल्याणमध्ये मार्च २०२४ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली वडिलांना अटक करण्यात आली होती. आलोक दिनेश गुप्ता (१५) या मुल
कल्याणमध्ये मार्च २०२४ मध्ये घडलेल्या एका खळबळजनक घटनेत, अल्पवयीन मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली वडिलांना अटक करण्यात आली होती. आलोक दिनेश गुप्ता (१५) या मुलाचा मृत्यू चाकूने भोसकून झाला होता. या प्रकरणात वडील दिनेश गुप्ता (४४) यांना वाकोला पोलिसांनी अटक केली होती. तथापि, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विजयकुमार बोहरा यांनी या प्रकरणात तपासातील त्रुटी, पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या विसंगतींचा विचार करून आरोपी वडिलांना निर्दोष मुक्त केले. या निर्णयामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, विशेषतः पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीवर.
आरोपी दिनेश गुप्ता याला अटक झाल्यानंतर तो मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात होता. त्याच्या जामीन अर्जाला सत्र न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर, आरोपीच्या वकिलांनी खटला चालवला, ज्यामध्ये सात साक्षीदारांची साक्ष घेतली गेली. यामध्ये फिर्यादी प्रीती दिनेश गुप्ता (आरोपीची मुलगी) आणि सोनी दिनेश गुप्ता (आरोपीची पत्नी) यांच्यासह इतर स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश होता. या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता, मुंबई सत्र न्यायालयाने जलद गतीने दीड वर्षांच्या आत या खटल्याचा निकाल दिला. तथापि, साक्षीदारांच्या साक्षींमध्ये असलेल्या विसंगती आणि स्वतंत्र साक्षीदारांच्या साक्षींचा आधार घेऊन सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला.



















