Fashion Trends in Sari: श्रावणात प्राजक्ताच्या फुलांच्या साड्यांचा जलवा

श्रावण महिन्याची सुरुवात होताच सणावारांची धूमधडाक सुरू होते. उपवास, मंगळागौर, पूजा-अर्चा आणि विविध सणांच्या दिवशी महिलांनी सजण्याची एक विशेष उत्सुकता असते. पारं
श्रावण महिन्याची सुरुवात होताच सणावारांची धूमधडाक सुरू होते. उपवास, मंगळागौर, पूजा-अर्चा आणि विविध सणांच्या दिवशी महिलांनी सजण्याची एक विशेष उत्सुकता असते. पारंपरिक सणांमध्ये भारतीय महिलांना कॉटनच्या साड्या नेहमीच प्रिय असतात. यंदाच्या फॅशन ट्रेंडमध्ये प्राजक्ताच्या फुलांच्या डिझाइन असलेल्या कॉटन साड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. नागमोडी वेलींवर फुललेल्या पांढऱ्या आणि केशरी प्राजक्ताच्या फुलांचा नाजूक डिझाइन साडीवर येताच, त्या साडीचे सौंदर्य अधिक खुलते. श्रावणातील या प्रसन्न वातावरणात निसर्गाच्या सानिध्यात असण्याचा अनुभव देणाऱ्या या साड्या प्रत्येक महिलाच्या वॉर्डरोबमध्ये असायला हव्यात. यंदा श्रावणातील सणांसाठी प्राजक्ताच्या फुलांच्या डिझाइन असलेल्या साड्या विशेष ट्रेंडमध्ये आहेत. पांढऱ्या आणि केशरी रंगाच्या प्राजक्ताच्या फुलांनी सजलेल्या या साड्या साधेपणातही अत्यंत आकर्षक आणि एलिगंट लूक देतात. हलक्या, आरामदायी आणि दिवसभर सहज नेसता येणाऱ्या या साड्या नागपंचमी, मंगळागौर, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा आणि श्रावणातील इतर सणांसाठी उत्तम पर्याय ठरतात. प्राजक्ताच्या फुलांचे नाजूक प्रिंट आणि मिनिमल डिझाइनमुळे ही साडी कोणत्याही वयोगटातील महिलांना शोभून दिसते. साधासुदा प्लेन ब्लाऊज किंवा इतर रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज या साडीसोबत खूप सुंदर दिसतो. ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी किंवा मोत्यांच्या दागिन्यांसोबत लूक अधिक खुलतो. साडीच्या मुख्य भागावर ठराविक अंतरावर पांढऱ्या रंगाची छोटी, डौलदार प्राजक्ताची फुले विणलेली आहेत. हे छोटे मोटिफ्स साडीला एक साधा पण मोहक रूप देतात. या साड्यांची खरी ओळख म्हणजे त्यांचे सुंदर, देखणे नाजूक पारंपरिक काठ. काठावर भौमितिक नक्षी आणि पारंपारिक डिझाईन्स पांढऱ्या, राखाडी किंवा इतर गडद रंगांच्या धाग्यांनी विणलेल्या आहेत. हा काठ साडीला एक हेवी आणि पारंपारिक लूक देतो. प्राजक्ताच्या फुलांची सुंदर बुट्टी असणाऱ्या साड्यांचे अतिशय गडद आणि उठावदार रंग अप्रतिम दिसतात. ऑलिव्ह हिरवा, गडद जांभळा, मरून आणि गडद काळा-हिरवा या गडद रंगांवर पांढऱ्या रंगाचा काठ आणि पांढऱ्याशुभ्र प्राजक्ताच्या फुलांची नक्षी अत्यंत सुंदर दिसते. या साड्या जरी टिपिकल, पारंपरिक दिसत असल्या तरी, त्यावरील प्राजक्ताच्या ट्रेंडी फुलांची नक्षी नेहमीपेक्षा एकदम हटके लूक देते.



















