Technical Issues Halt Mahadbt Portal:महाडीबीटी पोर्टल ९० दिवसांपासून बंद; लाभार्थ्यांना त्रास

राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी महत्त्वाचे असलेल्या महाडीबीटी पोर्टलवर गेल्या ९० दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे सेवा उपलब्ध नाही. यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्य
राज्य सरकारच्या विविध योजनांसाठी महत्त्वाचे असलेल्या महाडीबीटी पोर्टलवर गेल्या ९० दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे सेवा उपलब्ध नाही. यामुळे विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, निराधार, शेतकरी यांसारख्या अनेक लाभार्थ्यांची कामे ठप्प झाली आहेत. महाडीबीटी पोर्टलवर २.० अपग्रेडेशन प्रक्रियेत आहे, परंतु अद्याप सेवा पूर्ववत झालेली नाही. त्यामुळे अर्ज, पडताळणी, मंजुरी आणि अनुदान वितरणाची प्रक्रिया संथ झाली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. राज्य सरकारने १ ते १५ जून दरम्यान पोर्टल बंद राहणार असल्याचे जाहीर केले होते, परंतु त्यानंतर ३० जून आणि १५ जुलैपर्यंत सेवा सुरू होईल, असे सांगितले होते. तथापि, ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही तांत्रिक अडचणी कायम आहेत.
या समस्यांचा सर्वाधिक फटका संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि मुख्यमंत्री वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना बसत आहे. लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करताना नावातील किरकोळ त्रुटी किंवा माहितीतील विसंगतीमुळे प्रमाणपत्र स्वीकारले जात नसल्याची तक्रार केली आहे. पोर्टल बंद असल्याने या त्रुटींच्या दुरुस्त्या करता येत नसल्याने हजारो लाभार्थ्यांचे हयात प्रमाणपत्र प्रलंबित आहे. यामुळे लाभार्थ्यांना अनुदान मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची प्रक्रिया थांबली आहे.





















