Samay Raina's Generosity:समय रैनाकडून आसाम पूरग्रस्तांना १० लाखांची मदत

कॉमेडीयन समय रैनाने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी समयने 'मुख्यमंत्
कॉमेडीयन समय रैनाने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकली आहेत. आसाममध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी समयने 'मुख्यमंत्री मदत निधी'त १० लाख रुपयांची देणगी दिली आहे. या मदतीबद्दल मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी समय रैनाचे आभार मानले आहेत. दुसरीकडे, चाहत्यांनी मुख्यमंत्र्यांना समय रैनाविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्याची विनंती केली आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी आपल्या 'एक्स' (X) अकाउंटवर मुख्यमंत्री मदत निधीचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये समय रैनाच्या प्रॉडक्शन टीमने दिलेल्या १० लाख रुपयांच्या मदतीची माहिती होती. त्यांनी म्हटले, "आसामच्या या कठीण काळात मदतकार्य करण्यास योगदान दिल्याबद्दल समय, तुझे आभार!" असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं. आसामच्या या कठीण काळात समय रैनाची मदत खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे अनेक लोकांना आधार मिळेल.
समय रैनाने दिलेल्या या मदतीची बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पूर आला आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी समयचे कौतुक केल्यानंतर, चाहत्यांनी जुना वाद विसरून त्याच्याविरोधात दाखल केलेला पोलीस खटला मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. एका युझरने म्हटले, "सर, कृपया त्याच्याविरोधातील FIR मागे घ्या, तो वाईट माणूस नाही." दुसऱ्या एका युझरने लिहिले, "प्रत्येक कठीण प्रसंग माणसाला बदलण्याची संधी देतो." यामुळे समय रैनाच्या चाहत्यांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे, ज्यामुळे त्याच्या कामाची प्रशंसा केली जात आहे.

















