Monsoon Strengthening Despite El Nino:मान्सूनला ‘एल निनो’ स्थितीतही बळ मिळणार

मुंबई: सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाची हलकी नोंद होत असली तरी एकंदरीत मान्सूनने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कसे राहील याब
मुंबई: सध्या राज्यात काही ठिकाणी पावसाची हलकी नोंद होत असली तरी एकंदरीत मान्सूनने विश्रांती घेतल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाचे प्रमाण कसे राहील याबद्दल सर्वांचे लक्ष लागले आहे. याच दरम्यान, प्रशांत महासागरात ‘एल निनो’ स्थितीमुळे हवामानात बदल होत असताना, भारतात दोन कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे मान्सूनला पुन्हा बळ मिळण्याची शक्यता आहे. हवामान तज्ञांच्या मते, या कमी दाबाच्या प्रणालींचा प्रभाव देशातील काही भागात पावसाचा जोर वाढवेल. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा आहे.
शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी नैऋत्य उत्तर प्रदेश आणि त्याच्या आसपास कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यानंतर शनिवारी, ८ ऑगस्ट रोजी दक्षिण गंगेच्या खोऱ्यात पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा येथे आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. या दोन्ही प्रणालींचा एकत्रित प्रभावामुळे देशभरातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वातावरणात अधिक आर्द्रता येते आणि जसजसे हे क्षेत्र पुढे सरकते, तसतसे त्या भागात उंच ढगांची निर्मिती होते, ज्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता वाढते. जुलै महिन्यात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चांगला पाऊस झाला होता.





















