Quick Nylon Khaman Idli Recipe:झटपट नायलॉन खमन इडलीची रेसिपी

सकाळच्या नाश्त्यासाठी खमन ढोकळा हा एक लोकप्रिय आणि आवडता पदार्थ आहे. विशेषतः नायलॉन खमन खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे खमन मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत असते, ज्या
सकाळच्या नाश्त्यासाठी खमन ढोकळा हा एक लोकप्रिय आणि आवडता पदार्थ आहे. विशेषतः नायलॉन खमन खाण्याची मजा काही वेगळीच असते. हे खमन मऊ, लुसलुशीत आणि रसरशीत असते, ज्यामुळे त्याची चव अद्वितीय लागते. अनेक वेळा घरच्या घरी ढोकळा बनवताना तो कडक होतो किंवा त्याला हवी तशी जाळी येत नाही. पण तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्ही इडलीच्या भांड्यात अगदी बाजारासारखा परफेक्ट नायलॉन खमन तयार करू शकता. यासाठी तुम्हाला काही सोप्या पद्धतींचा अवलंब करावा लागेल. चला तर मग, पाहूया कसे करायचे हे!
सर्वप्रथम, एका मोठ्या भांड्यात बेसन चाळून घ्या. त्यात लिंबू सत्व, साखर, मीठ, हळद, तेल आणि थोडे पाणी घालून चमच्याने नीट फेटा. हे मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ नसावे. मिश्रण तयार झाल्यावर ते १० मिनिटे झाकून ठेवा. या दरम्यान, इडलीच्या पात्रात पाणी उकळायला ठेवा आणि इडलीच्या प्लेट्सना तेल लावून ग्रीस करून घ्या. आता पिठामध्ये इनो किंवा खाण्याचा सोडा घाला आणि हलक्या हाताने पुन्हा फेटा. हे मिश्रण फुगून हलके होईल. आता हे मिश्रण इडलीच्या साच्यांमध्ये ओता आणि इडलीचे पात्र बंद करून मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे वाफेवर शिजवा. शिजल्यावर सुरी किंवा टूथपिकने तपासा.
ढोकळा शिजत असताना, दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्या. त्यात अर्धा कप पाणी आणि साखर घालून पाण्याला उकळी येऊ द्या. इडलीच्या आकाराचे मऊ ढोकळे पात्रातून बाहेर काढा. त्यावर तयार केलेली कोमट फोडणीचे पाणी चमच्याने सर्वत्र पसरवा, जेणेकरून ढोकळा ते पाणी शोषून घेईल आणि छान रसरशीत होईल. शेवटी, वरून कोथिंबीर आणि किसलेला ओला नारळ घाला. तुमचा झटपट, मऊ आणि जाळीदार नायलॉन खमन ढोकळा खाण्यासाठी तयार आहे! हा ढोकळा इडलीसारखा गोलाकार दिसतो, पण चवीला आणि टेक्श्चरला अस्सल नायलॉन खमनसारखाच अप्रतिम लागतो.





















