Upcoming Film 'Valmiki Ramayana': रणबीर कपूरच्या 'रामायण'आधी प्रदर्शित होणार 'वाल्मीकि रामायण'

रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता निश्चित झाली आहे. हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी, दिवाळीच्या दोन दिवस आधी प्रदर्शित ह
रणबीर कपूरच्या बहुप्रतीक्षित 'रामायण' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख आता निश्चित झाली आहे. हा चित्रपट ६ नोव्हेंबर २०२६ रोजी, दिवाळीच्या दोन दिवस आधी प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच भारतीय प्रेक्षकांना रामायणावर आधारित एक नवीन चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव 'वाल्मीकि रामायण' असून, तो रणबीर कपूरच्या 'रामायण'च्या आधी प्रदर्शित होणार आहे. 'वाल्मीकि रामायण' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शिका भावना तलवार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात महर्षी वाल्मीकी यांच्या मूळ रामायणावर आधारित कथा प्रामाणिक आणि प्रभावी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाच्या कथा लेखनाची जबाबदारी 'बाहुबली'चे लेखक आनंद नीलकांतन यांनी घेतली आहे, तर संवाद डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी लिहिले आहेत. तांत्रिक दृष्ट्या या चित्रपटाला अधिक भव्य आणि दर्जेदार बनवण्यासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार बिनोद प्रधान आणि ऑस्कर विजेते साउंड डिझायनर रसूल पुकुट्टी यांची टीम देखील सामील आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण भारतातच करण्यात आले आहे. 'वाल्मीकि रामायण' हा चित्रपट अजय देवगणच्या 'दृश्यम ३'शी बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे. दुसरीकडे, रणबीर कपूरच्या 'रामायण'समोर हॉलीवूडचा मोठा चित्रपट 'गॉडझिला मायनस झिरो'चा आव्हान असणार आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी दिग्दर्शन केलेल्या 'रामायण'मध्ये रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता आणि यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये तयार होत असून, त्यात व्हीएफएक्सचा वापर करण्यात आलेला आहे. अनेक दिग्गज कलाकारांची फौज या चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेतील आणि बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे.












