Gobardhan Yojana: शेतकऱ्यांनो आता शेणातून मिळवा पैसे, सरकार देणार अनुदान; गोबरधन योजनेला केंद्राची मंजुरी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जनावरांच्या शेण, शेतीतील अवशेष आणि सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्री
नवी दिल्ली: केंद्र सरकारने जनावरांच्या शेण, शेतीतील अवशेष आणि सेंद्रिय कचऱ्याचा उपयोग करून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने 'गोवर्धन-राष्ट्रीय चक्राकार जैव-ऊर्जा योजना' मंजूर केली आहे, ज्यासाठी पुढील दहा वर्षांसाठी २३,७३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत बायोगॅस प्रकल्पांसाठी अनुदान, सुलभ कर्ज, निश्चित बाजारपेठ आणि हमीभावाची व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांचे शेण, शेतीतील अवशेष आणि ओला कचरा बायोगॅस प्रकल्पांना विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. यामुळे शेतीच्या उत्पन्नासोबतच आणखी एक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होणार आहे.
बायोगॅसच्या विक्रीसाठी हमखास ग्राहक मिळणार आहेत. कंप्रेस्ड नैसर्गिक वायू आणि घरगुती पाईपद्वारे पुरविल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूमध्ये बायोगॅस मिसळणे टप्प्याटप्प्याने बंधनकारक करण्यात आले आहे. २०२६-२७ मध्ये ३ टक्के, २०२७-२८ मध्ये ४ टक्के आणि २०२८-२९ पासून ५ टक्के मिश्रण अनिवार्य असेल. यामुळे उत्पादित बायोगॅसची विक्री होण्याची खात्री राहणार आहे. याशिवाय, २,११० रुपये प्रति एमएमबीटीयू हा किमान खरेदी दर निश्चित करण्यात आला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांची चांगली किंमत मिळेल.



















