Maharashtra Rain:राज्यातील १९० तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस; 'या' ८ तालुक्यांत ५० टक्क्यांपेक्षाही कमी पर्जन्य

पुणे : राज्यातील पावसाच्या स्थितीवर एक नजर टाकल्यास, १ जून ते ७ ऑगस्ट या कालावधीत ३५५ तालुक्यांपैकी फक्त आठ तालुक्यांत सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे.
पुणे : राज्यातील पावसाच्या स्थितीवर एक नजर टाकल्यास, १ जून ते ७ ऑगस्ट या कालावधीत ३५५ तालुक्यांपैकी फक्त आठ तालुक्यांत सरासरीच्या २५ ते ५० टक्के पाऊस झाला आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके, कोल्हापूरमधील दोन, तसेच नाशिक आणि अहिल्यानगरमधील प्रत्येकी एक तालुका समाविष्ट आहे. यामुळे राज्यातील एकूण १९० तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये ५४ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे, तर १६५ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामुळे पावसाच्या वितरणात असमानता स्पष्टपणे दिसून येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
राज्यातील पावसाची स्थिती ३१ जुलैपर्यंत चांगली होती, त्यावेळी १७५ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी आणि १८० तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, ७ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार कमी पाऊस असलेल्या तालुक्यांची संख्या १५ ने वाढून १९० झाली आहे, तर सरासरी ओलांडलेल्या तालुक्यांची संख्या १८० वरून १६५ पर्यंत कमी झाली आहे. यामुळे पावसाच्या वितरणात असमानता स्पष्टपणे दिसून येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ७५ ते १०० टक्के पाऊस झालेल्या १२८ तालुक्यांत ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतील अनेक तालुक्यांनी सरासरी ओलांडली आहे.





















