Google's Major Decision:गुगलचा मोठा निर्णय! Google Drive वरून फोटो-व्हिडीओ ऑटो-बॅकअप बंद; जुन्या फोटोंचं काय होणार?

गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. १० ऑगस्टपासून, गुगलने आपल्या डेस्कटॉप ॲपद्वारे गुगल फोटोमध्ये थेट फोटो आणि व्हिडिओंचा ब
गुगल ड्राइव्ह वापरणाऱ्या युजर्ससाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. १० ऑगस्टपासून, गुगलने आपल्या डेस्कटॉप ॲपद्वारे गुगल फोटोमध्ये थेट फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विंडोज आणि मॅक संगणक वापरणाऱ्या युजर्सना याचा थेट परिणाम होणार आहे. यामुळे आता संगणकावरील फोटो आणि व्हिडिओ गुगल फोटोमध्ये आपोआप सिंक होणार नाहीत. याबाबत गुगलने जून महिन्यातच युजर्सना माहिती दिली होती, परंतु आता या निर्णयामुळे अनेक युजर्स चिंतेत आहेत. जुने फोटो आणि व्हिडिओ गुगल ड्राइव्हवरून हटवले जातील का, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. गुगलने यावर स्पष्टता दिली आहे की, पूर्वीच्या बॅकअपमध्ये असलेले सर्व फोटो आणि व्हिडिओ सुरक्षित आहेत आणि ते डिलीट होणार नाहीत. यामुळे युजर्सना थोडा दिलासा मिळाला आहे. संगणकावरील इतर फाईल्सच्या सिंकिंग प्रक्रियेत कोणताही बदल होणार नाही, फक्त फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप थांबला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस मोबाईल वापरकर्त्यांना याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण गुगल फोटो ॲपद्वारे ऑटोमॅटिक बॅकअप चालू राहील.
गुगलने या बदलाचा मुख्य उद्देश डिजिटल सेवांना अधिक सुलभ आणि ग्राहकांसाठी अनुकूल बनवणे असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे गुगल ड्राइव्ह आता फक्त क्लाउड स्टोरेज आणि फाईल-सिंकिंगसाठी वापरला जाईल, तर गुगल फोटो स्वतंत्रपणे फोटो आणि व्हिडिओंचे व्यवस्थापन आणि बॅकअप करण्यासाठी वापरण्यात येईल. यामुळे युजर्सना त्यांच्या फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घेण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार करावा लागेल. जर तुम्हाला संगणकावर स्टोरेज फोटो आणि व्हिडिओंचा बॅकअप घ्यायचा असेल, तर तुम्ही गुगल फोटोच्या अपलोड पर्यायांचा वापर करू शकता किंवा इतर कोणत्याही बॅकअप सेवांचा विचार करू शकता. यामुळे युजर्सना मॅन्युअली अपलोड करण्याची आवश्यकता भासेल, ज्यामुळे त्यांना त्यांच्या नवीन फोटो सुरक्षित ठेवण्यासाठी काही अतिरिक्त पावले उचलावी लागतील.





















