Human Existence and Pain:मानवी अस्तित्वाच्या वेदना

मराठी साहित्यात काही कादंबऱ्या केवळ कथा सांगत नाहीत, तर त्या समाजातील विविध आयुष्यांचे प्रतिनिधित्व करतात. कवयित्री व लेखिका रश्मी पदवाड-मदनकर यांची कादंबरी 'का
मराठी साहित्यात काही कादंबऱ्या केवळ कथा सांगत नाहीत, तर त्या समाजातील विविध आयुष्यांचे प्रतिनिधित्व करतात. कवयित्री व लेखिका रश्मी पदवाड-मदनकर यांची कादंबरी 'कायांतर' ही त्यातली एक महत्त्वाची कादंबरी आहे. या कथेचा केंद्रबिंदू एक तृतीयपंथी स्त्री आहे, जिने आपल्या जीवनात अनेक संघर्ष आणि वेदना अनुभवल्या आहेत. तृतीयपंथी समुदायाच्या जीवनातील विविध पैलूंचा शोध घेणारी ही कादंबरी, त्यांच्या अस्तित्वाच्या लढाईचा एक दस्तऐवज आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या या समुदायाच्या वास्तवाचे चित्रण अत्यंत संवेदनशीलतेने केले आहे. त्यामुळे ही कादंबरी एक अद्वितीय साहित्यकृती बनली आहे, जी वाचकांना विचारात पडायला लावते.
या कादंबरीची कथा करोनाच्या जागतिक संकटाच्या काळात सुरू होते, जेव्हा लेखिकेला तृतीयपंथी समुदायाच्या वस्त्यांमध्ये जाण्याची संधी मिळते. तिथे भेटलेल्या व्यक्तींच्या आयुष्याच्या संघर्षांनी लेखिकेच्या मनावर गडद ठसा उमठवला. पोटापाण्याच्या लढाईत आणि स्वतःच्या अस्तित्वासाठीच्या संघर्षात तृतीयपंथीयांचे जीवन कसे आहे, हे लेखिकेने अत्यंत प्रामाणिकपणे मांडले आहे. या अनुभवांमुळे 'कायांतर' कादंबरी केवळ कल्पनेच्या आधारावर नाही तर वास्तवाच्या धरातळावर उभी आहे. लेखिकेच्या मनोगतात ती एक महत्त्वाची गोष्ट सांगते, की जर या पुस्तकाने वाचकांच्या मनात तृतीयपंथीयांचे जीवन महत्त्वाचे आहे, याची जाणीव जागवली, तर तिचा लेखनप्रवास यशस्वी झाला असे मानेल.



















