VIDEO: मंत्र्यांचा माईक बंद पडल्यावर IAS अधिकाऱ्यांची धावपळ

वर्धा : शासन आणि प्रशासन यांचे समन्वय अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये मंत्रीमंडळाचा रुतबा आणि धाक महत्वाचा असतो. मंत्री बोलतात
वर्धा : शासन आणि प्रशासन यांचे समन्वय अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामध्ये मंत्रीमंडळाचा रुतबा आणि धाक महत्वाचा असतो. मंत्री बोलतात आणि अधिकारी त्यानुसार कार्य करतात, हा लोकशाहीचा मूलभूत तत्त्व आहे. परंतु काही अधिकारी मंत्र्यांच्या आदेशांना न जुमानता आपला कार्यभार चालवतात. यामुळे अनेकदा मंत्री आणि अधिकारी यांच्यात ताणतणाव निर्माण होतो. २५ वर्षांच्या सेवेत २६ वेळा बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांच्या अनुभवामुळे मंत्र्यांची मर्जी राखणे आवश्यक ठरते. मात्र, मर्जी राखण्याचे प्रमाण काय असावे, याबाबत अनेकदा चर्चाही होते. काहीवेळा तर मंत्र्यांच्या पायात बूट चढवण्याचे प्रकारही घडतात, ज्यामुळे वाद निर्माण होतो. आजच्या घटनेला काय म्हणावे?
आज हिंगणघाट येथे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात ४०० बेडच्या रुग्णालयाच्या बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय सहकार नेते सुधीर कोठारी, नगराध्यक्षा डॉ. नयना तुळसकर, भाजप जिल्हाध्यक्ष संजय गाते, आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी वान्मथी सी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत माईक अचानक बंद पडला.





















