Important Announcement in Parliament:केंद्र सरकारने डिझेल-इथेनॉल मिश्रणाबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारने डिझेलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावर देशभरात चर्चा सुरू असतानाच, सरकारने डिझे
केंद्र सरकारने डिझेलमध्ये इथेनॉलच्या मिश्रणाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणावर देशभरात चर्चा सुरू असतानाच, सरकारने डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याची योजना पूर्णपणे रद्द केली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे इंधनाचा 'फ्लॅश पॉईंट' कमी होतो, ज्यामुळे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राज्यसभेत या निर्णयाबाबत माहिती दिली. 'फ्लॅश पॉईंट' म्हणजे इंधनातून निघणारी वाफ हवेच्या संपर्कात येऊन आग लागण्याची शक्यता असलेला किमान तापमान. डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्याने हा फ्लॅश पॉईंट खूपच कमी होतो, ज्यामुळे आग लागण्याच्या घटनांची शक्यता वाढते. त्यामुळे सरकारने डिझेलमधील इथेनॉल ब्लेंडिंगचा विचार सोडून दिला आहे.
डिझेलचा फ्लॅश पॉईंट कमी झाल्यामुळे त्याची साठवणूक, वाहतूक आणि पेट्रोल पंपांवरील टाक्यांमध्ये ठेवणे धोकादायक ठरू शकते. यामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण २० टक्क्यांहून अधिक वाढवण्याबाबतही सरकारने स्पष्ट केले आहे की, सध्या कोणताही निर्णय घेतलेला नाही. भविष्यात इथेनॉलचे प्रमाण वाढवायचे असल्यास, सर्व शास्त्रीय आणि तांत्रिक चाचण्यांनंतरच निर्णय घेतला जाईल. यामध्ये ऑटोमोबाईल कंपन्या आणि संशोधन संस्थांशी सखोल चर्चा होईल, असे मंत्री सुरेश गोपी यांनी स्पष्ट केले.
E20 पेट्रोलच्या वापरावर बोलताना सरकारने याची पूर्णपणे सुरक्षितता सांगितली आहे. ARAI, SIAM, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि IIP यांच्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये E20 मुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर किंवा मायलेजवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही, असा दावा सरकारने केला आहे. सध्या देशात २० कोटींहून अधिक दुचाकी आणि ३ कोटींहून अधिक पेट्रोल गाड्या इथेनॉल-मिश्रित पेट्रोलवर चालत आहेत आणि इंजिन खराब झाल्याचा कोणताही प्रमाणित पुरावा समोर आलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले. सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉलच्या वापरावर आणि इंधनाच्या सुरक्षेवर एक नवा दृष्टिकोन येणार आहे.





















