Water Supply Disruption: वांद्रे - जोगेश्वरीदरम्यान पाणीपुरवठा बंद

मुंबईतील वांद्रे पूर्व ते जोगेश्वरी पूर्व परिसरात मंगळवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या काळात काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर क
मुंबईतील वांद्रे पूर्व ते जोगेश्वरी पूर्व परिसरात मंगळवारी २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. या काळात काही भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील. विशेषतः देशांतर्गत विमानतळ आणि वांद्रे टर्मिनसचा पाणीपुरवठा या २४ तासांच्या कालावधीत बंद राहणार आहे. मुंबई महापालिकेच्या के दक्षिण आणि एच पूर्व विभागात पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. यामध्ये २४०० मिलीमीटर व्यासाची वैतरणा जलवाहिनी अंशतः खंडित करण्याचे काम मंगळवारी, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरू होईल आणि बुधवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संपेल. त्यामुळे अंधेरी – जोगेश्वरी पूर्व दरम्यानच्या भागात (के दक्षिण) कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, तर संपूर्ण वांद्रे – खार पूर्व (एच पूर्व) विभागाचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.
कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या परिसरात के दक्षिण विभागातील कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपूरा, देऊळवाडी, मासळी बाजार, घाटीवाडा, चकाला, पी. ॲण्ड टी. वसाहत यांचा समावेश आहे. या ठिकाणी दुपारी २ ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच, कोलडोंगरी, ओल्ड पोलीस लेन, विजय नगर (सहार रोड), मोगरापाडा याठिकाणी सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. बुधवारी, १२ ऑगस्ट रोजी सहार गाव, सुतार पाखडी, कार्गो संकुल याठिकाणी सकाळी ५ ते ८ या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.



















