Rainfall Statistics:राज्यात पावसाने सरासरी गाठली; मराठवाडा, विदर्भात पावसाची ओढ

मुंबई : एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असतानाही, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सरासरी ६२२.७ मिमी पाऊस पडतो, त
मुंबई : एल-निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाची शक्यता असतानाही, यंदाच्या पावसाळ्यात राज्यात आतापर्यंत ६३७.१ मिमी पाऊस झाला आहे. यंदा सरासरी ६२२.७ मिमी पाऊस पडतो, त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा दोन टक्के अधिक पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. तथापि, विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे, जेथे सरासरीच्या तुलनेत पावसाची मात्रा कमी आहे. राज्यात पावसाने सरासरी गाठली असली तरी सर्व जिल्ह्यात समान प्रमाणात पाऊस पडलेला नाही.
सरासरीपेक्षा अधिक पाऊस मुंबई उपनगर, पालघर, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत झाला आहे. तर मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, सांगली, धाराशीव, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सरासरी इतका पाऊस झाला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात १०.२ मिमी पाऊस पडतो, तर यंदा ३.६ मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच पहिल्या आठवड्यात ६५ टक्के कमी पाऊस झाला आहे.
वाशिम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, अकोला, जालना, हिंगोली, बीड, सोलापूर आणि नंदूरबार या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. हिंगोलीत सरासरीच्या तुलनेत ३६ टक्के कमी पाऊस झाला आहे, जिथे या काळात सरासरी ४६२.२ मिमी पाऊस पडतो, तर यंदा २९५.५ मिमी पाऊस झाला आहे. राज्यातील ३०२९ धरणांमध्ये ७१.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे, ज्यामुळे धरणांतील पाणीसाठा ३६८३५.६५ दलघमी आहे. विभागानुसार पाणीसाठा नागपूरमध्ये ५८.९१ टक्के, अमरावतीत ५८.०३ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ४८.६९ टक्के, नाशिकमध्ये ७३.५४ टक्के, पुणे विभागात ८४.७८ टक्के आणि कोकण विभागात ८६.११ टक्के आहे.





















