Rain in Kolhapur: गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस, राधानगरी धरणातून विसर्ग सुरुच; काळम्मावाडीतूनही पाणी सोडणार

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण १०० टक्के भरले असून, त्यात ८.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आणि ६ खु
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण १०० टक्के भरले असून, त्यात ८.३३ टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी ७ वाजताच्या अहवालानुसार धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक ३ आणि ६ खुले आहेत, ज्यामुळे ४,२५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला असला तरी गुरुवारी जोरदार पाऊस झाला. पंचगंगा नदी आणि उपनद्यांच्या पाणीपातळीत स्थिरता येऊ लागली आहे. दुपारी चार वाजता राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी ३० फूट ७ इंच (५३९.५१ मीटर) इतकी असून, ३१,५५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या जिल्ह्यातील ४३ बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणांपैकी राधानगरी, कडवी, चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा, जांबरे, आंबेओहोळ, सर्फनाला आणि कोदे लघुपाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. कुंभीत ८९.७२ टक्के, वारणा धरणात ८८.२६ टक्के, कासारी ८६.७१ टक्के, पाटगाव ८३.८३ टक्के आणि दूधगंगा धरणात ८१.०२ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील पंचगंगा, वारणा, दूधगंगा, वेदगंगा, कासारी, भोगावती, कुंभी, तुळशी, ताम्रपर्णी, हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदीवरील एकूण ४२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ८.९ मिमी पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ४६ मिमी पाऊस झाला असून भुदरगडमध्ये १५.१ मिमी, राधानगरीत १२.२ मिमी, आजरा येथे १२ मिमी आणि पन्हाळ्यात १० मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण क्षेत्रातील पावसामुळे आवक कायमधरण क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपातील दमदार पाऊस सुरू असून, धरणांमध्ये पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतून नियंत्रित स्वरूपात विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. गेल्या आठ तासांत कासारी धरण क्षेत्रात ८९ मिमी, कुंभीत ४२ मिमी, जांबरेत ३०, राधानगरीत २४, वारणेत २०, कडवीत २३, घटप्रभेत १८, पाटगावात १७ मिमी पावसाची नोंद झाली. एकूण २० रस्ते बंदपूरस्थितीचा परिणाम अद्याप कायम असून पुलांवर पाणी आल्याने ५ जिल्हा मार्ग आणि १५ ग्रामीण मार्ग, असे एकूण २० रस्ते बंद आहेत. करवीर, शिरोळ, भुदरगड, पन्हाळा, शाहूवाडी, कागल, गगनबावडा आणि चंदगड तालुक्यांतील काही मार्गांवर पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी दुचाकी वाहतूक सुरू असली तरी अवजड वाहनांना अद्याप प्रवेश बंद आहे.



















