Potholes in Nashik:नाशिकमधील खड्ड्यांनी उद्ध्वस्त केली स्वप्नं; वेदनांचा हिशोब कोण देणार?

बापरे! डोक्याला नऊ टाके, हाताला फॅक्चर... नाशिक शहर 'खड्ड्यांत', वृत्तपत्र विक्रेत्याला बसला मोठा फटका. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे! दीड वर्षांतच कोट्यवधींचा रस्ता
बापरे! डोक्याला नऊ टाके, हाताला फॅक्चर... नाशिक शहर 'खड्ड्यांत', वृत्तपत्र विक्रेत्याला बसला मोठा फटका. जिकडे तिकडे खड्डेच खड्डे! दीड वर्षांतच कोट्यवधींचा रस्ता उखडला; अपघाताचा मोठा धोका. ४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री उपनगर येथील जुन्या सायखेडा रोडवरून जात असताना रस्त्यातील मोठे खड्डे चुकविताना माझी दुचाकी घसरली आणि मी रस्त्यावर पडलो. या अपघातात माझ्या पायाला गंभीर दुखापत होऊन १४ टाके घालावे लागले. तसेच हाताला आणि डोक्यालाही मार लागला. या दुर्घटनेमुळे मला नियोजित परीक्षेलाही जाता आले नाही, त्यामुळे शैक्षणिक नुकसानही सहन करावे लागले. अपघातात माझ्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. एका खड्यामुळे शारीरिक वेदना, मानसिक तणाव आणि आर्थिक फटका अशा तिहेरी संकटाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे आता नागरिकांच्या भवितव्याशी खेळणारे जीवघेणे सापळे बनले आहेत. प्रशासनाने रस्त्यांची दुरुस्ती करून अशा निष्काळजीपणामुळे दुसऱ्या कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही, याची जबाबदारी घ्यावी.





















