Development Projects Inauguration:मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार कोल्हापुरात विविध विकासकामांचे लोकार्पण

कोल्हापूर शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कागल येथील शाहू महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप
कोल्हापूर शहरात विविध विकासकामांचे लोकार्पण आणि कागल येथील शाहू महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रविवारी, ९ ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यात येत आहेत. या कार्यक्रमात नूतनीकरण केलेल्या सीपीआरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदार आणि जिल्ह्यातील विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. नूतनीकरण झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर होणार आहे, ज्याची तयारी सुरू आहे. याआधी मुख्यमंत्र्यांनी पोलिस अपार्टमेंटचे उद्घाटन करणे अपेक्षित आहे.
सीपीआर परिसरातील कार्यक्रमामुळे सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि विविध विभागांतील समन्वयाची तयारी तपासण्यासाठी शनिवार, ८ ऑगस्ट रोजी रुग्णालय परिसरात विशेष वाहतूक नियंत्रण लागू करण्यात आले आहे. या नियंत्रणानुसार, शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून कार्यक्रम संपेपर्यंत शासकीय वाहनांव्यतिरिक्त सर्व खासगी दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना रुग्णालय परिसरात प्रवेश बंद राहणार आहे. रुग्णसेवा कोणत्याही परिस्थितीत बाधित होणार नाही याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. रुग्णवाहिका, अग्निशामक दलाची वाहने, पोलिस, सुरक्षा व इतर आपत्कालीन सेवांची वाहने, कार्यक्रमासाठी अधिकृत परवानाधारक शासकीय वाहने तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाईल, असे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी कळवले आहे.



















