Tata Motors Launches Nexon Camo Edition: टाटा मोटर्सने नेक्सॉन कॅमो एडिशन लॉन्च केला

टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सनचा नवीन कॅमो एडिशन भारतीय बाजारात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये प्रीमियम फीचर्स आणि अत्याधुन
टाटा मोटर्सने आपल्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही टाटा नेक्सनचा नवीन कॅमो एडिशन भारतीय बाजारात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये प्रीमियम फीचर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे तो ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, हा कॅमो एडिशन पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार इंधन निवडण्याची सुविधा मिळते. टाटा नेक्सन कॅमो एडिशनची थेट स्पर्धा मारुती सुझुकी ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, किआ सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही ३ एक्सओ, स्कोडा कायलाक आणि किआ सिरॉस यांसारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींशी होणार आहे. या स्पर्धेत टाटा नेक्सन कॅमो एडिशनच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे त्याला एक वेगळा स्थान मिळेल, अशी अपेक्षा आहे.
या नवीन एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९ लाख ९९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना या एसयूव्हीचे Creative, Creative+ S, Creative+ PS, Fearless+ PS आणि Fearless+ A PS या विविध ट्रिम्समध्ये खरेदी करता येईल. या लिमिटेड एडिशनमध्ये 'मुन्नार मिस्ट' आणि 'कूर्ग क्लाउड' हे दोन नवीन आकर्षक रंग उपलब्ध आहेत, जे ग्राहकांच्या आवडीनुसार निवडले जाऊ शकतात. टाटा नेक्सन कॅमो एडिशनमध्ये तीन शक्तिशाली इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये १.२-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन १२० HP पॉवर आणि १७० Nm टॉर्क निर्माण करते, तर १.५-लिटर डिझेल इंजिन ११५ HP पॉवर आणि २६० Nm टॉर्क देते. याशिवाय, १.२-लिटर टर्बो पेट्रोल-CNG इंजिन १०० HP पॉवर आणि १७० Nm टॉर्क क्षमतेचे आहे. ट्रान्समिशनसाठी ६-स्पीड मॅन्युअल, एएमटी आणि ७-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत.











