Political Turmoil in Maharashtra:शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे वादग्रस्त विधान

नंदुरबार – महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली धुसफूस थांबण्याचे संकेत दिसत नाहीत. मतदार याद्यांच्
नंदुरबार – महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेली धुसफूस थांबण्याचे संकेत दिसत नाहीत. मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या पराभवाचे उदाहरण देत देशात नंगट लोकांचे राज्य चालू असल्याची टीका केली. त्यांच्या या विधानामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रघुवंशी यांचे हे विधान शहादा येथील मीरा प्रताप लॉन्समध्ये १८ जुलै रोजी आयोजित एसआयआर मोहिमेच्या मेळाव्यात झाले. या मेळाव्यात शिंदे गटाचे आमदार आमश्या पाडवी आणि लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी शिरीष चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमात काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. रघुवंशी यांच्या भाषणातील काही वाक्ये समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाल्याने भाजपमध्ये नाराजीची लाट पसरली आहे.
रघुवंशी यांनी मेळाव्यात एसआयआर मोहिमेचे महत्त्व सांगताना पश्चिम बंगालच्या निवडणुकीचे उदाहरण दिले. त्यांनी स्पष्ट केले की, “ममता बॅनर्जी यांचा पराभव सहज शक्य नव्हता. एसआयआरच्या माध्यमातून ९० लाख मतदार कमी झाले. बॅनर्जी यांना मतदान करणारे अल्पसंख्यांक समाजाचे मतदार कमी झाल्यामुळे त्यांचा पराभव झाला,” असे त्यांनी सांगितले. याबाबत बॅनर्जी न्यायालयात गेल्या असून ज्या स्ट्रॉंगरुममध्ये इव्हीएम ठेवण्यात आले होते, त्यालाच आग लावण्यात आल्याने न्यायालय काय निर्णय देणार, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी “इतने नंगे लोगोंका राज हैं इस देश मे” असे विधान केले. यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना एसआयआर मोहिमेच्या महत्त्वाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.





















