Environmental Committee Halts Highway Project: २४,९३९ कोटींच्या वाढवण बंदर-समृद्धी महामार्गाला पर्यावरण समितीचा ब्रेक

नारायण जाधव, नवी मुंबई - वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या २४,९३९ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पर्यावरणीय अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्
नारायण जाधव, नवी मुंबई - वाढवण बंदराला समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या २४,९३९ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला पर्यावरणीय अडथळा निर्माण झाला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या 'टर्म्स ऑफ रेफरन्स' मंजूर करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे १०६.०७८ किलोमीटर लांबीच्या या महामार्गाच्या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली आहे. समितीने वैतरणा धरणाच्या सुरक्षिततेवर संभाव्य परिणाम, २१२.१ हेक्टर वनक्षेत्राचा बळी आणि डहाणूच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील मार्ग याबाबत गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. १५-१६ जुलै २०२६ रोजी झालेल्या ४५५व्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीच्या बैठकीत या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. या सर्व बाबींचा विचार करून समितीने पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेतील पहिल्याच टप्प्यावर ब्रेक लावला आहे. प्रकल्पाची संवेदनशीलता लक्षात घेता, उपसमितीने प्रत्यक्ष स्थळ पाहणी करावी आणि त्यानंतरच टर्म्स ऑफ रेफरन्स मंजुरीबाबत निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली आहे.
पर्यावरणीय मंजुरी प्रक्रियेत सामान्यतः टर्म्स ऑफ रेफरन्स सहज मंजूर होतात, परंतु या प्रकरणात ईएसीने तीही मंजूर न करता प्रस्ताव स्थगित केल्याने वाढवण बंदराच्या या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पासमोर पर्यावरणीय अडथळे अधिक ठळकपणे समोर आले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रस्तावित केलेला हा सहापदरी महामार्ग एनएच-४८ वरील तवा ते नाशिक जिल्ह्यातील भारवीर (समृद्धी महामार्ग) असा जाणार आहे. तथापि, समितीने नमूद केले की चेनज ६८ ५०० ते ८९ ५०० दरम्यानचा मार्ग वैतरणा जलाशयाच्या अत्यंत जवळून जात असल्याने धरणाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागात पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार करण्याचे निर्देश समितीने दिले आहेत.













