Green Initiative in Palghar: पालघरच्या हरित अभियानाला गती मिळाली

पालघर जिल्ह्यात पावसामुळे वृक्षलागवडीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी एक कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवण्य
पालघर जिल्ह्यात पावसामुळे वृक्षलागवडीस अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत २०२६-२७ या वर्षासाठी एक कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध शासकीय विभागांना ३३,०२,००० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट दिले गेले आहे. यामध्ये आजपर्यंत ४,८८,१०४ वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या पावसामुळे जमिनीतील आर्द्रता वाढल्याने वृक्षांची वाढ आणि संवर्धनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व शासकीय विभागांनी स्थानिक परिस्थिती, उपलब्ध जमीन आणि रोपांची उपलब्धता विचारात घेऊन वृक्षलागवडीचे नियोजन केले आहे. जिल्हा प्रशासनाने विभागनिहाय वृक्षलागवडीचा नियमित आढावा घेतला आहे आणि निश्चित उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. वृक्षलागवडीच्या यशस्वीतेसाठी प्रत्येक रोपाचे जतन, संरक्षण आणि नियमित देखभाल करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सर्व संबंधित विभाग सक्रियपणे काम करीत असून, मागील वर्षीच्या यशस्वी कामगिरीच्या आधारे यंदाही अधिक वृक्षलागवड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिक, शासकीय अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सामाजिक संघटनांच्या सहभागातून पालघर जिल्हा अधिक हरित, पर्यावरणपूरक आणि समृद्ध करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत २०२५-२६ मध्ये पालघर जिल्ह्याला ३८ लाख ४० हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यामध्ये प्रत्यक्षात ४४,८४,२६० वृक्षांची लागवड करण्यात आली. यामुळे पालघर जिल्ह्याने निर्धारित उद्दिष्टापेक्षा सुमारे ६ लाख ४४ हजार अधिक वृक्षांची लागवड करून उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. यंदाच्या वर्षातील वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन अभियानालाही यामुळे अधिक बळ मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने १३ जुलै रोजी एक पूरकपत्र जारी केले. मुख्यमंत्री यांचा जन्मदिवस आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांच्या नेतृत्वाखाली २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान” राबविण्यात आले. या अभियानाद्वारे जिल्ह्यात विविध ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. शासकीय विभागांनी समन्वय साधून स्थानिक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीला अनुरूप प्रजातींच्या रोपांची लागवड केली. मुख्यमंत्री महोदयांच्या जन्मदिनानिमित्त व्ही.बी.-जी.राम.जी. योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५३१ जलतारा कामे पूर्ण करण्यात आली आहेत. या कामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल, भूजलपातळी वाढेल आणि नव्याने लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनास हातभार लागेल. योजने अंतर्गत आजतागायत झालेली लागवड व्ही.बी.जी.राम.जी. योजने अंतर्गत १५९५४४ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.



















