Blouse fitting hacks without sewing machine:ब्लाऊज खांद्यावरुन उतरतं, ढगळं- गबाळं दिसतं? ३ टिप्स- मशिनशिवाय झटपट फिटिंग करण्याची पाहा युक्ती

श्रावण महिना सुरु झाला की सणांचा उत्सव सुरू होतो. या काळात अनेक महिला साडी घालण्यास प्राधान्य देतात. घरातील पूजा, मंदिरात जाणे किंवा कौटुंबिक समारंभ यासाठी साडी
श्रावण महिना सुरु झाला की सणांचा उत्सव सुरू होतो. या काळात अनेक महिला साडी घालण्यास प्राधान्य देतात. घरातील पूजा, मंदिरात जाणे किंवा कौटुंबिक समारंभ यासाठी साडी आणि आकर्षक ब्लाऊज आवश्यक असतात. सध्या अनेक महिलांना कुर्ती किंवा वेस्टर्न कपडे घालणे अधिक आवडते. त्यामुळे प्रत्येक सणासाठी नवीन साडी- ब्लाऊज खरेदी करण्याऐवजी, बहीण, नणंद किंवा इतर कोणाचे साड्या आणि ब्लाऊज वापरण्यात येतात. दुसऱ्यांचे ब्लाऊज वापरताना किंवा जुने ब्लाऊज घालताना अनेक वेळा ते सैल होतात. खांद्याची फिटिंग कमी होते आणि ब्लाऊजचा गळा मोठा असल्यास तो खांद्यावरून घसरतो. यामुळे संपूर्ण लूक बिघडतो आणि साडी सावरताना अस्वस्थता निर्माण होते. त्यामुळे ब्लाऊजची योग्य फिटिंग मिळवणे आवश्यक आहे.
टेलरकडे वेळेवर जाऊन शिलाई करणे किंवा अल्टरेशन करणे नेहमी शक्य नसते. परंतु, टेलरकडे न जाता किंवा सुई-दोऱ्याचा वापर न करता काही सोप्या आणि उपयुक्त हॅक्सच्या मदतीने आपण सैल होणारा ब्लाऊज कसा परफेक्ट फिट करू शकतो हे पाहूया. जर ब्लाऊजचा गळा खूप डीप असेल आणि खांदे वारंवार खाली घसरत असतील, तर सुई- दोऱ्याशिवाय फिटिंग करणे शक्य आहे. यासाठी ब्लाऊजला उलटा करा आणि खांद्याच्या भागावर बोटांच्या मदतीने मोजमाप घ्या. जितका भाग सैल आहे, तिथे कापडाला चुण देऊन लहान आकाराच्या दोन सेफ्टी पिन्स लावा, जशा आपण सुईने शिवतो. कापडावर पिनची पकड घट्ट असायला हवी. दोन्ही खांद्यांवर आतल्या बाजूने पिन्स लावल्यामुळे गळ्याचा घेर कमी होतो आणि ब्लाऊज खांद्यावर व्यवस्थित बसतो.



















