Famous Illustrator Shridhar Ambhore Passes Away:प्रसिद्ध रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचे निधन

अहिल्यानगर: प्रसिद्ध रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचे सोमवारी पहाटे जालना येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते आणि अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. जालना येथेच
अहिल्यानगर: प्रसिद्ध रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांचे सोमवारी पहाटे जालना येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते आणि अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. जालना येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. श्रीधर अंभोरे हे अविवाहित होते. त्यांच्या कलात्मक रेखाचित्रांमध्ये बिनचेहऱ्यांची कष्टकरी, वंचित माणसे विशेषतः महिला यांचे चित्रण केले जाते. त्यांनी मानवी स्वभावातील विविधता आणि निसर्गातील घटकांमध्ये एकरूपता शोधण्याचा प्रयत्न केला. लेखक व नाटककार विजय तेंडुलकर यांनी त्यांच्या जीवनावर आधारित ‘दिंडी’ हा माहितीपट तयार केला होता. महावीर जोंधळे यांनी अंभोरे यांच्या जीवनावर ‘श्रीधररेषा’ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. जालना येथील उर्मी त्रैमासिकाने त्यांच्यावर विशेषांक काढला आहे.
श्रीधर अंभोरे मूळचे विदर्भातील अकोले जिल्ह्यातील चिखली गावचे होते. टपाल खात्यातील नोकरीनिमित्त नगर शहरात आले आणि तिथेच स्थायिक झाले. गेली ४० वर्षे ते नगरच्या साहित्य परिवाराचे महत्त्वाचे सदस्य होते. करोनानंतर ते जालना येथे त्यांच्या भावाकडे राहण्यासाठी गेले होते. तिथेच त्यांचे आजारपण सुरू असताना निधन झाले. दीड वर्षांपूर्वी त्यांच्या रेखाचित्रांचे अखेरचे प्रदर्शन झाले होते. त्यांना कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘फाय फाउंडेशन’ने गौरवले होते. विखे साहित्य सेवा पुरस्कारासह इतर पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले.





















