Delicious Red Chutney Without Coconut: नारळ न घालता करा चमचमीत लाल चटणी

इडली आणि डोसा या लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थांसोबत चटणी किंवा सांबार हा एक अनिवार्य भाग असतो. अनेक घरांमध्ये वीकेंडला इडली किंवा डोसा बनवला जातो, परंतु त्यासो
इडली आणि डोसा या लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थांसोबत चटणी किंवा सांबार हा एक अनिवार्य भाग असतो. अनेक घरांमध्ये वीकेंडला इडली किंवा डोसा बनवला जातो, परंतु त्यासोबत ओल्या नारळाची चटणी तयार करणे अनेकांना किचकट आणि वेळखाऊ वाटते. नारळ फोडणे, त्याचे तुकडे करणे यामध्ये बराच वेळ जातो. मात्र, नारळ न वापरता सुद्धा चटणी तयार करता येते आणि ती चटणी चवीला नारळाच्या चटणीपेक्षा कमी नाही. ही चटणी कमी साहित्यात झपाट्याने तयार होऊ शकते. ओल्या नारळाऐवजी शेंगदाणे वापरून चटणी तयार करणे हे एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग, इडलीसोबत खाण्यासाठी बनवली जाणारी ही चटणी कशी तयार करायची ते पाहूया.
बिना नारळाची लाल चटणी तयार करण्यासाठी सर्वप्रथम शेंगदाणे भाजून त्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर एका कढईत तेल गरम करून भाजलेले शेंगदाणे हलकेसे तळून घ्या. त्यानंतर त्यात जीरं आणि चण्याची डाळ घालून परतवून घ्या. कांदा घालून तो गुलाबी रंग येईपर्यंत परतवा. त्यानंतर लसूण आणि मिरच्याही घालून व्यवस्थित परतवा. आता टोमॅटोचे तुकडे घालून सर्व मिश्रण एकजीव करा. त्यात थोडं मीठ घालून मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट तयार करा. पाण्याचे प्रमाण कमी ठेवा, कारण चटणी घट्ट असावी लागते. चटणी तयार झाल्यावर वरून तेल, मोहरी, जीरं आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन सर्व्ह करा. ही चटणी इडली, डोसा किंवा वड्यासोबत खाण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.



















