Alert! Only 30% Pure Paneer in Market:बाजारात केवळ ३० टक्केच शुद्ध पनीर

पुणे: पनीरच्या विक्रीसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ॲनालॉग किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादनावर एक वर्षासाठ
पुणे: पनीरच्या विक्रीसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ॲनालॉग किंवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादनावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाचे दुग्ध उद्योगाने स्वागत केले आहे. ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि दुग्ध उद्योगाला प्रोत्साहन देणे, हे या निर्णयाचे मुख्य उद्दिष्ट आहे. उद्योगातील तज्ञांच्या मते, सध्या बाजारात विकल्या जाणाऱ्या पनीरमध्ये सुमारे ७० टक्के ॲनालॉग पनीर आहे, ज्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत होती. त्यामुळे या निर्णयामुळे ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पनीर मिळण्यास मदत होईल, असे मानले जात आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयानुसार, ॲनालॉग पनीरच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. राज्यभरात केलेल्या तपासणीत पनीरचे ३५.४ टक्के नमुने मानकांशी विसंगत आढळले. अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर होत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांमुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. ॲनालॉग पनीर स्वस्त असल्याने हॉटेलांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता, ज्यामुळे ग्राहकांना गुणवत्तेच्या बाबतीत गोंधळ झाला होता.



















