Fast Travel from Mumbai to Chennai:मुंबई, चेन्नईकडील प्रवास होणार वेगवान; सेवाग्राम-सेलू रोडदरम्यान तिसरा, चौथा रेल्वेमार्ग पूर्ण

नागपूर : नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावरील सेवाग्राम ते सेलू रोडदरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या नव्या मार्गा
नागपूर : नागपूर-वर्धा रेल्वे मार्गावरील सेवाग्राम ते सेलू रोडदरम्यान उभारण्यात आलेल्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वेमार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या नव्या मार्गाची सुरक्षितता आणि कार्यक्षमता तपासण्यासाठी शनिवारी १३० किमी प्रतितास वेगाने विशेष रेल्वे धाववून चाचणी घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात हा मार्ग अत्यंत व्यस्त आहे, जिथे मुंबई, चेन्नई आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रवासी रेल्वे नियमितपणे धावतात. याशिवाय, या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक देखील केली जाते, ज्यामुळे या मार्गाचे महत्त्व आणखी वाढते. विद्यमान दोन रेल्वेमार्गांवर वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन तिसरा आणि चौथा रेल्वेमार्ग उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सेवाग्राम-सेलू रोडदरम्यानचा हा टप्पा पूर्ण झाल्यामुळे या महत्त्वपूर्ण प्रकल्पात आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार झाला आहे.
नवीन मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) यांच्याकडून वैधानिक तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी दरम्यान मोटर ट्रॉलीद्वारे संपूर्ण मार्गाची पाहणी केली जाईल. रेल्वे रुळांची स्थिती, पूल, समपातळी फाटक, सिग्नल व्यवस्था आणि इतर तांत्रिक सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीनंतर, नव्या मार्गाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी १३० किलोमीटर प्रतितास वेगाने विशेष चाचणी रेल्वे धाववण्यात येईल. चाचणी पूर्ण झाल्यानंतर मार्गावरील वेगमर्यादा आणि परिचालनासंबंधी निर्णय घेतले जाणार आहेत.



















