Exciting Football Tournament in Vasai-Virar:वसई-विरार महापालिकेची १४ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा उत्साहात !

वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय, पालघर यांच्या सहकार्याने आयोजित केलेली १४ वी
वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने, महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय, पालघर यांच्या सहकार्याने आयोजित केलेली १४ वी सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा १ ते ५ ऑगस्ट दरम्यान विरार पश्चिमेकडील म्हाडा मैदानावर अत्यंत उत्साही वातावरणात पार पडली. या स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील एकूण ८६ संघांमधून १,३७६ खेळाडूंनी भाग घेतला. १५ वर्षांखालील मुले, १७ वर्षांखालील मुले आणि १७ वर्षांखालील मुली अशा तीन गटांत ही स्पर्धा रंगली. अंतिम सामन्यात खेळाडूंमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, विशेषतः १७ वर्षांखालील मुलांच्या गटात पेनल्टी शूट-आउटद्वारे विजेते ठरवण्यात आले. पंचांचे योग्य नियोजन, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि क्रीडाप्रेमींचा उत्साह यामुळे संपूर्ण मैदान खेळाडूंच्या आनंदाने भरले होते.
पारितोषिक वितरण सोहळ्यात विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक व पदके देऊन गौरविण्यात आले. विजेत्या संघांना आता विभागीय आणि राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धांमध्ये पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या सोहळ्यात उपमहापौर मार्शल लोपीस, नगरसेवक अजय रॉड्रीक्स, अजित भोईर, गणेश पाटील, परेश किणी, उप-आयुक्त (क्रीडा) अजित मुठे, सहायक आयुक्त नीता कोरे आणि क्रीडा स्पर्धा प्रमुख योगेश चौधरी यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
















