








नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ‘रालोआ’ आघाडीमध्ये सामील झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ‘रालोआ’ आघाडीमध्ये सामील झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आणि तृणमूल काँग्रेसच्या फुटीर खासदारांना एक स्पष्ट संदेश दिला. ‘काळजी करू नका, मी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे, कोणालाही चिंता करण्याची गरज नाही,’ असे त्यांनी सांगितले. मोदींच्या या संदेशाने खासदारांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी ‘रालोआ’च्या ४१ खासदारांशी संवाद साधला. या संवादामध्ये ठाकरे गटातील फुटीर ६ खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे २ खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील २० फुटीर खासदारांचा समावेश होता. मोदींनी यावेळी ‘रालोआ’ हे एक कुटुंब असल्याचे सांगत प्रत्येक घटक पक्ष आणि खासदाराला समान संधी मिळेल, असे स्पष्ट केले. ‘मी केवळ एका पक्षासोबत नाही, तर ‘रालोआ’च्या प्रत्येक खासदाराच्या पाठीशी उभा आहे,’ असे त्यांनी सांगून खासदारांना धीर दिला.
मोदींनी सर्व ‘रालोआ’ खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी थेट पंतप्रधान कार्यालयाशी (पीएमओ) संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ‘आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी पीएमओशी थेट संपर्क ठेवा. गरीब, शेतकरी, कामगार यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांच्या समस्या समजून घ्या,’ असे त्यांनी सांगितले. यावेळी राजकीय वातावरणावर भाष्य करताना मोदींनी खासदारांना दिल्लीतील राजकीय चर्चांच्या आणि अफवांच्या भोवऱ्यात न अडकण्याचा सल्ला दिला. विरोधी पक्षांच्या खासदारांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. संसदीय लोकशाहीतील संवादाचे महत्त्व लक्षात घेत, मोदींनी प्रत्येक खासदाराशी स्वतंत्रपणे संवाद साधला आणि त्यांच्या प्रकृतीची, कुटुंबाची चौकशी केली.
मोदींनी राज्यातील खासदारांशी स्वतंत्रपणे मराठीत संवाद साधला. शिवसेना-शिंदे गटात दाखल झालेल्या ठाकरे गटाच्या सहा खासदारांचे त्यांनी विशेष स्वागत केले आणि त्यांच्याशी उत्साहाने चर्चा केली. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची विचारपूस करताना मोदींनी त्यांच्या योगाभ्यास आणि व्यायामाच्या दिनक्रमाबाबत विचारणा केली. नियमित व्यायाम आणि योगाभ्यास सुरू ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे खासदार पार्थ पवार यांच्याशीही मोदींनी मराठीत संवाद साधला. पार्थ पवार यांच्याकडे त्यांनी त्यांच्या आई व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल आवर्जून चौकशी केली. आगामी काळात संघटनात्मक तसेच संसदीय कामकाजात सक्रिय राहण्याचे आवाहनही मोदींनी मराठी खासदारांना केले.
Naxalism Declines:स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतर नक्षलवाद्यांचा माज उतरला


Lawyer's Fee Dispute:कल्याण दिवाणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
Political Anticipation for Voters List:अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीची राजकीय क्षेत्राला प्रतिक्षा
Loan Scheme Controversy:मिरा-भाईंदर महापालिका मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेण्याचा घाट!
Prime Minister's Time for Rebels: उद्धव ठाकरे यांची टीका
Job Crisis in India:राहुल गांधींची बेरोजगारीवर टीका
Meeting with Modi: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार पंतप्रधान मोदींची उद्या भेट घेणार
Development Concerns: ७५ वर्षांतील विकासाची वाटचाल खटकली म्हणून उपवर्गीकरणाचा घाट
Reservation Controversy:आरक्षणाच्या उपवर्गीकरणावर खासदार बर्वे यांची टीका
New Political Equation? CJP's Saurav Das and Ratna Singh Meet Aditya Thackeray:नव्या समीकरणाची नांदी? CJPचे सौरव दास, रत्ना सिंग आदित्य ठाकरेंच्या भेटीला
Political Shift in Nagpur:मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मतदारसंघातील मतदारांचे स्थानांतर