NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात धक्कादायक खुलासे

नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने केलेले नवीन खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत. देशभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तज्ज्ञांनी पैशांच्या लालस
नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने केलेले नवीन खुलासे अत्यंत धक्कादायक आहेत. देशभरात चर्चेत असलेल्या या प्रकरणात नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या तज्ज्ञांनी पैशांच्या लालसेमुळे पेपर लीक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे, लातूर आणि राजस्थानमधील सीकरपर्यंत पसरलेल्या या रॅकेटमध्ये कोचिंग क्लासेसचे संचालक, एजंट आणि पालकांचा मोठा सहभाग असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणात एनटीएच्या केमिस्ट्री एक्सपर्ट पी. व्ही. कुलकर्णी यांचा मुख्य सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी पुणे आणि लातूरमध्ये विशेष क्लासेस घेतले होते. त्यांच्या मोबाईलमध्ये नीटच्या केमिस्ट्री पेपरशी संबंधित ९ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांचे फोटो सापडले. सीबीआयने MyGate ॲपच्या एंट्री रेकॉर्ड आणि मोबाईल सीडीआर तपासून विद्यार्थ्यांनी कुलकर्णी यांच्या घरी गेल्याचे सिद्ध केले आहे. विद्यार्थ्यांच्या नोट्स लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचेही आढळले आहे. परीक्षा संपल्यानंतर एका विद्यार्थ्याच्या आईने कुलकर्णी यांना महागडे घड्याळ भेट दिल्याचे पुरावेही तपासात आले आहेत. याशिवाय एनटीएच्या फिजिक्स एक्सपर्ट मनीषा संजय हवलदार यांनी २५ हजार रुपये घेऊन एका विद्यार्थ्याच्या आईला फिजिक्सचे प्रश्न लीक केले. त्यांनी १४ एप्रिल रोजी हे प्रश्न आरोपी तेजस शाह याला सांगून लिहून घेतले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर मनीषा हवलदार यांनी पुरावे नष्ट करण्यासाठी किचनमध्ये प्रश्न आणि हिंट्स लिहिलेली वही जाळून टाकली. आरोपी तेजस शाह यानेही आपले नोट्स नष्ट केल्याची कबुली दिली आहे.
लातूर येथील प्रसिद्ध आरसीसी कोचिंग सेंटरचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये लीक झालेला पेपर 'मोस्ट एक्स्पेक्टेड' म्हणून वाटला. परीक्षेच्या आदल्या रात्री ४० ते ५० हॉस्टेल विद्यार्थ्यांमध्ये या लीक प्रश्नांची पीडीएफ शेअर करण्यात आली. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी क्लासचा मॉक टेस्टच खरा नीट पेपर असल्याचे दावे करणारे व्हिडिओ तयार केले होते. आरोपी मनीषा गुरुनाथ मांढरे आणि मनीषा वाघमारे या नेटवर्कमधील महत्त्वाच्या कड्या होत्या. त्यांनी थेट प्रश्नपत्रिका देण्याऐवजी एनसीआरटीच्या नवीन पुस्तकांमध्ये विशिष्ट पॅराग्राफ मार्क करून दिले आणि पुस्तकांच्या कडेला प्रश्न लिहून घेण्यात आले. प्रति विद्यार्थी ४ लाख रुपयांची डील करून पालकांकडून पैसे उकळण्यात आले. सीबीआयच्या तपासानुसार, परीक्षेच्या ३ दिवस आधी टेलीग्रामवर सॉफ्ट कॉपी सर्वप्रथम लीक झाली. आरोपी ऋषी बिवालने ती आदित्य मीनाला पाठवली आणि प्रति विद्यार्थी १० ते १२ लाख रुपयांची मागणी केली.



















