NDA MPs Protest Parliament: झारखंडमधील विद्यार्थ्यांवरील लाठीमारावरून NDA खासदार आक्रमक

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी पक्षांच्या निषेधार्थ मोर्चा काढला. सत्ताधारी खासदारांनी
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधी पक्षांच्या निषेधार्थ मोर्चा काढला. सत्ताधारी खासदारांनी यावेळी झारखंड येथे आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीमाराचा विषय उचलून धरत राहुल गांधींनी याप्रकरणी उत्तर द्यावे अशी मागणी केली. भाजपाचे खासदार राहुल गांधींवर टीका करत म्हणाले की, ते गृहमंत्र्यांकडून उत्तरांची मागणी करतात, पण स्वतः सभागृहात येत नाहीत. भाजपाचे खासदार संजय जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले की, “आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, पण राहुल गांधी चर्चा होऊ देत नाहीत आणि सभागृहाचे कामकाज अडवून ठेवत आहेत.” त्यामुळेच सत्ताधारी खासदारांनी त्यांच्या विरोधात मोर्चा काढला. भाजपाचे नेते अरुण सिंह यांनी राहुल गांधींवर टीका करत म्हटले की, “राहुल गांधी आणि प्रियांका गांधी झारखंडमध्ये का जात नाहीत? तिथे तरुणांना होणारी क्रूर मारहाण पाहत नाहीत? हे स्पष्ट आहे की, ते या सगळ्यापासून पळ काढत आहेत.”
भाजपाच्या खासदार अपराजिता सारंगी यांनी राहुल गांधींच्या गप्प राहण्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की, “झारखंडमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होत असताना राहुल गांधी गप्प आहेत. त्यांच्या गप्प राहण्यामागे काय कारण आहे? आम्हाला त्यांच्याकडून उत्तर हवे आहे.” कंगना रणौतनेही राहुल गांधींवर टीका केली. तिने म्हटले की, “ते देशाशी गद्दारी करत आहेत, सभागृहाचे कामकाज एका दिवसासाठीही चालू देत नाहीत. त्यांनी या विषयावर चर्चा करण्यास नकार दिला आहे.” कंगनाने राहुल गांधींच्या गप्प राहण्यावर जोरदार टीका केली आणि त्यांना देशाच्या हितासाठी बोलण्याचे आवाहन केले.





















